एकूण 34083 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द (ता. खेड) हद्दीत मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या पावसाचे पाणी आले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे महामार्गावर पाणी आले होते. ओढा बुजविल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - शहराच्या उपनगरांमध्ये आज सायंकाळी पावसामुळे नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. विशेषतः नगर रस्ता, सोलापूर रस्ता, खडकी-बोपोडी या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - नागपूर, अमरावती, बल्लारशा, पाटणा, वाराणसी, जयपूर, गोरखपूर, निजामुद्दीन आदी मार्गांवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. जादा गाड्या सोडल्याचा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा दावा आहे.  उत्तरेकडे तसेच नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आदी मार्गांवर जाणाऱ्या...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे-  राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर पावसाची मुसळधार सुरूच आहे. कमी कालावधीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मंगळवार (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील संगमनेर (ता. भोर) येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली....
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने पहिले आंबेडकरवादी विश्‍व साहित्य संमेलन आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी बॅंकॉक (थायलंड) येथे आयोजित केले आहे.  या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद खासदार अमर साबळे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. देश-...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई  - दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी सज्ज झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या आगारांतून दिवसाला 359 जादा बस सोडण्यात येणार आहेत. 24 ऑक्‍टोबर ते पाच नोव्हेंबर या दहा दिवसांत 3,500 जादा बस प्रवाशांच्या सेवेत असतील.  दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जादा बस...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - ""अध्यात्म आणि विज्ञान या दोहोंचाही अभ्यास न केल्याने अज्ञानातून याविषयी वाद निर्माण होतात. विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळे नाहीत. आत्म्याचे ज्ञान म्हणजे अध्यात्म. विज्ञानाची परिणती ही अध्यात्मातच होणार आहे. त्यामुळे या दोहोंचाही अभ्यास महत्त्वाचा आहे; अन्यथा तुमच्याकडे आलेले...
ऑक्टोबर 23, 2019
कोल्हापूर - पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते निवडून येतील असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा भाजपमधील वारसादार कोण? याची चर्चा...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांनी दांडियाचा आनंद लुटला. या महिला दोन महिने आधीपासून गरब्याचा सराव करीत होत्या. सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले. अपर पोलिस...
ऑक्टोबर 23, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच "फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान झाल्याने विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उमेदवारांना किमान लाखाचा टप्पा गाठावा लागेल. हे मतांचे गणित जुळवणाराच विजयी होणार आहे. गेल्या निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 23, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पार पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्या लढतींमुळेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. इंदापूरमध्ये 75, तर मावळमध्ये 71.16 टक्के मतदान झाले. त्याचा...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी ‘अप’ मार्गावर गुरुवारपासून (ता. २४) १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली असून, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. काही गाड्यांच्या...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरीकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. विशेषतः नगर रस्ता, सोलापुर रस्ता, खडकी-बोपोडी या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.  गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहराच्या...
ऑक्टोबर 22, 2019
बारामती शहर : येथील विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक आजिनाथ माने यांना आज आमराई परिसरात मारहाण करत तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात अशोक आजिनाथ माने हे बारामती शहर पोलीस ठाण्यात गेले असून तेथे त्यांची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू असल्याची...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : पुण्यासह राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणेे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज पुण्यात रात्री पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले. मध्य रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा ः बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा शहरातील श्रुती गोविंद भोसले हिची दोन वेळा एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरास निवड झाली. श्रुतीचे खेळातील कौशल्य पाहता साताऱ्याच्या बास्केटबॉल क्षेत्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.   निर्मला...
ऑक्टोबर 22, 2019
दौंड (पुणे) : दौंड शहरात आज दुपारी रोहित रवींद्र कांबळे या तरूणावर गोळीबार करण्यात झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २२) दुपारी चार वाजता दौंड- लिंगाळी रस्त्यावर वॅसकाॅन सोसायटी वळणावर हा गोळीबार झाला. रोहित हा दुचाकीवर असताना अनोळखी हल्लेखोराने रोहित याच्या मांडीवर व पाठीवर गोळ्या झाडल्या...
ऑक्टोबर 22, 2019
राजगुरुनगर (पुणे) : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणेच उत्साहात मतदान झाल्याने मतदानाची सरासरी 67 टक्‍क्‍यांवर गेली आहे. चुरशीची तिरंगी लढत झाल्याने मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत मतमतांतरे राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळचा...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : ''माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले परंतु, रोज क्षितिजावर दिसणारा तांबड्या ग्रहावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न अधुरेच आहे. मंगळावर पाऊल ठेवण्याचे हे स्वप्न 2035 पर्यंत पूर्ण करण्याचा चंग अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने बांधला आहे. यासंबंधीची माहिती नासाचे संचालक जीम ब्रीडस्टाइन यांनी...