एकूण 739 परिणाम
जून 11, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला. आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ...
जून 05, 2019
माले (पुणे) : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये अवैध शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन ठेवण्‍यात आले होते. बुधवार (ता. 5) पहाटे चार ते पाचच्‍या दरम्‍यान याबॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटात कार्यालयाच्‍या इमारतीचे मोठे नुकसान...
जून 04, 2019
पुणे - प्रवाशांना सहज आणि गतिमान वाहतूक सेवा पुरविण्यासाठी ऑनलाइन प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांकडून शहरात ऑनलाइन रिक्षा सेवा सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पैसे घेण्यास चालक टाळाटाळ करीत आहेत. ‘ऑनलाइन’ पैसे नाकारण्याचे प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीकडून...
जून 02, 2019
बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी...
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटीजवळ शुक्रवारी मध्य रात्री एक महिला रघुनंदन हॉल समोरील सर्व्हिस रस्त्यालगत पडून असल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ...
मे 28, 2019
धायरी : येथील बरांगणे मळा (चव्हाण बाग) येथे अर्धवट जळालेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 28) दुपारी तीनच्या सुमारास धायरी येथील बरांगणी मळा येथे अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरातील एका इसमाने माहिती दिली...
मे 27, 2019
पुणे - देखभाल दुरुस्ती झालेली बस मार्गावर बंद पडल्यास कार्यशाळेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बंद पडलेल्या बसला जॅमर लावून सुमारे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणीही पीएमपीने...
मे 25, 2019
पिंपरी (पुणे) : थेरगाव येथील पदमजी पेपर मिलला मोठी आग लागली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.  मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली....
मे 21, 2019
वणी : तालुक्यातील कैलासनगर येथे असलेल्या वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाची जाम झालेली टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेसाठी वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.  वणी परिसरात अनेक कोळसा खाणी आहेत. या...
मे 19, 2019
हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे येथून केमिकलचे...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे...
मे 16, 2019
पुणे - पत्नीवर संशय घेत तिच्यावर व नातेवाइकावर सुरीने वार करणाऱ्या पतीला १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. जगनारायण रामदेव कनोजिया (रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, आंबेगाव, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा...
मे 12, 2019
उदगीर : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जबरी व मोठमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. परवा झालेल्या त्रेचाळीस लाख रुपयाच्या घरफोडीच्या तपास अजून लागलेला नाही. असे असतानाच रविवारी (ता. 12) पहाटे साडेतीनच्या सुमारास एसटी कॉलनी परिसरातील शिवनगर येथे घरमालकाच्या गळ्याला सुरी लावून सहा तोळे सोने व आठ...
मे 10, 2019
पुणे -  नुसताच विटांचा थर, त्यावर सिमेंटचा मुलामा, चहूबाजूंनी ३५ फूट उंचीच्या भिंतींचा सांगाडा, फुटाचीही खिडकी नसलेल्या भपक्‍याआड दडलेल्या या ‘आलिशान शोरूम’चं छतही लोखंडी पत्र्यांचंच... अशा पोकळ; मात्र बाहेरून आलिशान वाटणाऱ्या शोरूममध्ये पाच निष्पापांचा दम तुटला. अर्थात, तो त्यांना...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले...
मे 04, 2019
नगर : नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात आज (शनिवार) पहाटे दोन वेगवेगळ्या अपघात एक ठार, तीन जखमी झाले. कंटेनर रस्त्यावर आडवे झाल्याने दोन तास वाहतूक खोळंबली होती. दुचाकी आणि टेम्पो अपघातात  दुचाकीस्वार कैलास अभिमान ससाणे ठार झाला. तर, दुसराकडे चास शिवारात पहाटे ट्रक आणि कंटेनरची...
मे 03, 2019
उंब्रज (ता. कराड) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर तासवडे टोलनाका येथे ऑक्सिजन टँकरला वॉल्व्ह लिक झाल्याने गळती झाली आहे. सदरची घटना सकाळी 10 वाजच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 30, 2019
पुणे : चंदननगर येथील भाजी मार्केटमधील हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. येरवडा अग्निशमन दलाने काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घन पोगरच्या साहाय्याने 5 मिनिटात शेटर उघडले व फर्स्ट...