एकूण 247 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही...
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
जून 15, 2019
चेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापराचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील संवादासाठी इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती करणारे सर्क्‍युलर दक्षिण रेल्वेकडून काढण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. "द्रमुक'ने आणि...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.   राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा...
जून 11, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून...
जून 08, 2019
पुणे : बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. आज (शनिवार) केरळच्या किनाऱ्यावर त्याची दमदार हजेरी लागल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. मॉन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मॉन्सूनमध्ये फारशी...
जून 03, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ३) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चाल केली आहे. मालदीव बेटे आणि कोमोरीन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विषुववत्ताकडून येणारे वाऱ्याचे प्रवाह, तसेच या भागात...
जून 02, 2019
बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी...
जून 01, 2019
पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण...
मे 30, 2019
पुणे : गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेस मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.   नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. ...
मे 23, 2019
पुणे - बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे.  बेगुसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी सीपीआयचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्यावर...
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27...
मे 23, 2019
पुणे: लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र काही तासांमध्ये स्पष्ट होणार असले तरी नेटझन्समध्ये हॅशटॅग युद्ध आज (बुधवार) सकाळपासून सुरू झाले आहे. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ट्रेंड आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्यासंबंधीत ट्रेंड ट्विटरवर सुरु आहेत...
मे 07, 2019
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बाॅर्डरला गेले. कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त पवार हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, रोहित पवार आदी त्यांच्यासोबत आहेत. शिष्टमंडळातील इतर...
मे 02, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल 83.4 टक्के लागला आहे. मुझफ्फरनगरची करिश्मा अरोरा आणि हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक माहिती अशी...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पाच वर्षात मोदींच्या संपत्तीत दुप्पट वाढ; आता एवढी आहे संपत्ती वाराणसीतून मोदी निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल भाजपचा आता...
एप्रिल 24, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अखेर पंतप्रधान मोदी सोडणार 'मौन'; 26 एप्रिलला घेणार पत्रकार परिषद मोदी अक्षयला म्हणाले, मला राग येतो, पण कोणाचा अपमान करत नाही मोदी हे '...