एकूण 107 परिणाम
जून 27, 2019
सायकल ही आमची गरज होती. मॅट्रिकनंतरच्या सुटीत काम करून मिळवलेल्या पैशाने पहिली सायकल विकत घेतली. पूर्वी पुणे हे सायकलींचे व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सायकल हे शहरातील प्रवासाचे सर्वसामान्यांचे मुख्य साधन होते. सायकल पुण्याच्या रस्त्यावरून...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मार्च 18, 2019
.   परवा सहज घर आवरायचं म्हणून एकेक करत कपाटं आवरायला काढली. कुठली वस्तु उपयोगी आहे, कुठली ठेवायला हवी हे सगळं ठरवता ठरवता दुपारच्या जेवणाची वेळ जवळ येऊन ठेपली. मग सर्व पसारा तसाच टाकुन मी उठले आणि स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला. भाजी कोणती करावी यासाठी भाजीच्या कप्प्यात नजर टाकली तर काही बऱ्याच...
मार्च 08, 2019
   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण...
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या...
डिसेंबर 10, 2018
"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय? आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद यातील काहीही असो, पण आज माझ्या चिमुकलीने यावर विचार करायला लावला. प्रसंग अगदी छोटाच...जबलपूर-पुणे परतीचा प्रवास...रात्री साधारण नऊची वेळ...
नोव्हेंबर 22, 2018
समोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद निर्माण झाली. नेहमीपेक्षा आज अगदी सकाळी सकाळी जाग आली. 5 वाजले होते. थंडीचे दिवस होते. खिडकीतून बाहेर पाहिले, जरा जास्तच अंधार वाटला. पुन्हा बिछान्यात पडले, पण आता उठावेच असे म्हणून उठले. चहा करायला स्वयंपाकघरात गेले. बाहेरचे...
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात...
ऑक्टोबर 23, 2018
निव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येतील अशा काही घटना असतात. पण, ते नकळत मिळालेले संदेश असू शकतात. वडील आजारी होते. कोरेगावहून त्यांना साताऱ्याला हलवले. आजार जास्त बळावल्याने पुण्यातील रुग्णालयात घेऊन गेलो. पण, तेथे उपचार होऊ शकत नसल्याने दुसऱ्या दवाखान्यात हलविणे भाग पडले. दोन दिवसांनी...
सप्टेंबर 22, 2018
तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट नेपाळमधे जायचे ठरवले. त्या काळी आजच्यासारखे गुगल नव्हते. त्यामुळे रस्ते आणि उतरायची ठिकाणे याची माहिती सहज उपलब्ध नव्हती. आम्हाला वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स...
ऑगस्ट 20, 2018
गाडी सुटायला पाच मिनिटे असताना शेजारच्या फलाटावर लोणावळ्यावरून येणारी लोकल आली. माझा भाऊ समोर उभा होता. आम्ही सगळ्यांनीच आनंदाने आरोळी ठोकली. काशीला जायचे, असे माझ्या भावाने व बहिणीने ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी गाडीचे आरक्षण आधीपासूनच करून ठेवले होते. माझ्या आईला आपल्या मुलांसोबत काशीला जायची...
ऑगस्ट 16, 2018
काउंट-डाउन सुरू झाला. काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येऊ लागले... आणि आमचे "यान' उडाले. "नासा'च्या "स्पेस कॅम्प'साठी आम्हा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. सुदेष्णा मॅडम, मंदीप सर आणि आमच्या प्राचार्यांसोबत आम्ही निघालो. सुमारे अठरा तासांचा प्रवास करून, फ्रॅंकफर्टला विमान बदलून आम्ही अटलांटाला पोहोचलो....
ऑगस्ट 07, 2018
बहिणीला सरळ प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळण्याची समस्या पस्तीस वर्षांपूर्वीही आजच्या सारखीच होती. घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचे कृपाछत्र हरवलेले. आम्ही बहीण-भावंडे शिक्षणामध्ये खंड पडू देत नव्हतो. बहीण बारावी उत्तीर्ण झाली. घराजवळच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला. प्रवेश यादीत तिचे नाव...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
जुलै 04, 2018
महाविद्यालयात असताना पाषाण तलावावर अनेकदा गेलो होतो. मध्यंतरीच्या काळात तिकडे जाणे झाले नव्हते. आता निघालो, तर आठवणीतल्या सगळ्या जुन्या वाटा बंद झालेल्या. पार वळसा घालून पाणवठ्याला भेट दिली. पाणवठा बदलला होता. कित्येक वर्षे लोटली. पाषाण तलावावर जाणे काही जमले नव्हते. नुकतीच छायाचित्रणकला शिकायला...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत...
जून 19, 2018
वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...! नुकतेच एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका कलाकाराने निरनिराळ्या आवाजांची नक्कल करून दाखवली. रूळ बदलताना रेल्वेचा होणारा आवाज अगदी हुबेहूब काढला. त्याच वेळी मी 40-50 वर्षे मागे...
जून 13, 2018
माझ्या आणि आईच्या नात्यात विलक्षण ऋणानुबंध होते. आईने सख्ख्या मुलांसह सावत्र मुलांनाही तितक्‍याच मायेने वाढविले. परिस्थितीनुरूप ती शिकत गेली. मला आईची तीव्रतेने आठवण झाली आणि मी अस्वस्थ झाले. तिचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील नीरा रेल्वे स्टेशन मास्तरच्या चाळीत नुकतेच राहावयास गेले होते...
जून 04, 2018
वाघेरा घाटाबाबत ऐकून होतो, त्या घाटातून रात्रीच्या प्रवासाचा अनुभव नव्हता. अगदी नाइलाजास्तव प्रवास करताना समोर प्रत्यक्षात वाघाचे दर्शन झाल्यावर काहीच सुचले नाही. नाशिक जिल्हा परिषदेत त्या दिवशी सायंकाळचे पाच वाजल्यावरही काम होण्याची कोणतीच चिन्हे दिसेना. आज आपल्याला इथेच आठ-नऊ वाजणार, कारण माझी...