एकूण 50 परिणाम
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे...
जून 05, 2019
आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया. चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक...
मे 10, 2019
पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती...
एप्रिल 29, 2019
परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे. त्याचं नाव अजिंक्‍य रवींद्र कोत्तावार. लहान असताना अजिंक्‍य उनाडक्‍या जास्त करायचा. आई- वडिलांनी परिचयाच्या आध्यात्मिक व्यक्तीकडे नेल्यावर...
एप्रिल 25, 2019
आपण अपयशी होतो त्यामागचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, की कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं व कोणत्या कामांना नाही हे आपल्याला ठरवता येत नाही. त्यामुळे आपला महत्त्वाचा वेळ/दिवस/महिने/वर्ष अनावश्‍यक गोष्टीत खर्च होतो. एखादं काम हातघाईला आल्यावर आपण करायला घेतो, कसं तरी धावपळ करत ते करतो. त्यामुळे त्या...
एप्रिल 10, 2019
‘जीएसटी’तून मिळणारे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे आले नाही, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. अंमलबजावणीतील ज्या उणिवा आता समोर स्पष्ट होत आहेत, त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर असेल. व स्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करपद्धतीतील एक मूलभूत सुधारणा वीस महिन्यांपूर्वी आपण अंमलात आणली....
डिसेंबर 29, 2018
कच्चे तेल आणि पर्यायाने इंधन समस्येवर दीर्घकालीन दृष्टिकोनातून मात करण्यासाठी सरकार विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. कारण आजही आपला देश कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 80 टक्के तेल आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या दरात वाढ झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. हे ऑक्‍...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 16, 2018
मोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण..! नमोजी : (विचारमग्न) हं! मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो? नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...) हं...हं! मोटाभाई : (कुतुहलानं) राफेलनो घपलो? नमोजी : (कपाळाला आठी) ना बाबा! मोटाभाई : (आणखी कुतुहलानं) पेट्रोल? नमोजी : (आणखी एक आठी...)...
ऑक्टोबर 13, 2018
मा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...
ऑक्टोबर 08, 2018
मोटाभाई : (चिंताग्रस्त सुरात) जे श्री क्रष्ण!  नमोजी : (खुशीत) जे श्री क्रष्ण...बद्धी तय्यारी झाली ने?  मोटाभाई : (अंगठा-तर्जनी जोडत) चोक्‍कस!  नमोजी : (सुटकेचा निश्‍वास सोडत) इलेक्‍सन म्हटला की तय्यारी करवुज पडशे! पछी टेन्सन नथी!  मोटाभाई : (खिन्न सुरात) पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत! ...
ऑक्टोबर 06, 2018
दिवाळीनंतर केव्हाही होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अखेर मोदी सरकारला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे भाग पडले आहे. हा निर्णय निव्वळ राजकीय आहे आणि रोजच्या रोज वाढणाऱ्या इंधनदरामुळे जनतेच्या निर्माण होणारा प्रक्षोभ लक्षात घेऊनच तो...
सप्टेंबर 27, 2018
भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही...
सप्टेंबर 20, 2018
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया...
सप्टेंबर 17, 2018
वेळापत्रकाप्रमाणे लोकसभा निवडणूक होणार असेल तर त्यासाठी फक्त सात महिन्यांचा अवधी आहे. वर्तमान लोकसभेची केवळ दोन अधिवेशने उरली आहेत. त्यातील शेवटचे जानेवारी-फेब्रुवारीतले अधिवेशन हा निव्वळ उपचार असेल ! थोडक्‍यात, देश आता "निवडणूक मानसिकते'मध्ये प्रवेश करता झाला आहे. राजकारणी मंडळींच्या अंगात वारे...
सप्टेंबर 17, 2018
हल्ली पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा इतका भडका उडाला आहे की विचारता सोय नाही. ह्या दरवाढीमुळेच आम्ही भलतेच चिंतित व त्रस्त व अस्वस्थ झालो आहो. हेच का ते अच्छे दिन? ह्याचसाठी का आम्ही तुम्हाला निवडून दिले? वास्तविक इंधनाचे दर इतके वाढवून ठेवण्याचे कारणच आम्हाला समजू शकत नाही. आहे तेच ...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...