एकूण 62 परिणाम
जून 18, 2019
पिंपरी - नवा गणवेश, नवा वर्ग, नवीन छत्री, नवीन दप्तरे, पाटी पेन्सिल, वॉटरबॅग, नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक, नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (ता. १७) शाळेची पहिली घंटा वाजली. उन्हाळी सुटीतील मौजमजेनंतर मुले शाळेत दाखल झाली अन्‌ बाळगोपाळांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा ‘...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
नोव्हेंबर 25, 2018
नवी मुंबई : सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेल्या लोकलची जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला धडक बसली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे प्रत्यक्षदर्शींनी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
ऑक्टोबर 07, 2018
सोलापूर : डीजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने मंडळांना प्रोत्साहन दिले आहे. याच अंतर्गत ढोल-ताशा आणि लेझीम स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने दणाणून गेला होता.  महापौर शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त...
ऑक्टोबर 01, 2018
कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
सप्टेंबर 07, 2018
पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा...
सप्टेंबर 03, 2018
नागपूरकरांचा पैसा कंपन्यांच्या घशात नागपूर : नागपूरकरांनी कर स्वरूपात महापालिकेत भरणा केलेला पैसा खासगी कंपन्यांच्या घशात जात आहे. गेल्या काही वर्षात नको त्या कामांसाठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेच्या तिजोरीला गळती लागली आहे. आर्थिक टंचाईची ओरड करणारे अधिकारी, पदाधिकारी...
ऑगस्ट 30, 2018
लातूर- ‘गणेशोत्सवाच्या काळात मागील वर्षी लातूर जिल्हा 90 टक्के डीजेमुक्त होता, असे म्हटले जाते. पण नव्वदच का, शंभर टक्के का नाही? यंदा डीजे किंवा ध्वनिवर्धकाच्या भिंती लावायच्या नाही म्हणजे नाही. कोणीही याबाबतची मागणी किंवा आग्रह करू नका. ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून कायद्याचे उल्लंघन कराल तर...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
ऑगस्ट 30, 2018
कोल्हापूर - गणेशोत्सवात अखेरचे तीन दिवस देखाव्यांची वेळ वाढवून मिळावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ध्वनी मर्यादेचे पालन करा, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. राजारामपुरी पोलिस ठाण्यातर्फे इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तालीम मंडळाच्या बैठकीत...
ऑगस्ट 10, 2018
जळगाव : राजकारणात यायचे असेल "पैसा आणि बाहुबल' आवश्‍यक आहे, असे म्हटले जाते. त्या भीतीने युवक राजकारणाकडे येत नाहीत. मात्र आजच्या स्थितीत काहीअंशी ते खरे असले तरी सामाजिक कार्यच तुमची ओळख असते आणि जनता त्यालाच अधिक महत्त्व देते. याची आपल्याला जाणीव झाली असून, आपण पराभूत झालो असलो तरी जनतेच्या मनात...
ऑगस्ट 07, 2018
पुणे - घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मुलांना अभ्यासासाठी शिकवणी लावणे अशक्‍य असते. त्यांच्यासाठी महापालिकेच्या महर्षीनगर येथील शाळेत काही वर्षांपूर्वी सुरू झालेली मोफत अभ्यासिका ही आशेचा किरण निर्माण करणारी बाब ठरली. पण आता ही अभ्यासिका अखेरचा श्‍वास घेतेय! कारण महापालिकेने या अभ्यासिकेसाठी...
ऑगस्ट 01, 2018
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग व इसिए संस्था यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पुरक शाडु मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा पालिकेच्या जुनी सांगवी मुले क्र.४९ शाळेत संपन्न झाली. शाडु माती मुर्तीचे काम, कला आणि कलाकारांचे कौतुक या उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात...
जुलै 04, 2018
सांगली - ‘आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशी जोरदार घोषणाबाजी आणि समर्थकांच्या शिट्या, टाळ्यांच्या गजरात आज खास सेना स्टाईलने इच्छुकांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली.  येथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सेनेच्या वतीने मुलाखती पार पडल्या. जिल्हाप्रमुख...