एकूण 159 परिणाम
जुलै 13, 2019
मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली होती....
जुलै 08, 2019
नाशिकः जुन्या नाशिकमधील काझीगढीवासीयांच्या पुनर्वसनासाठी चुंचाळे शिवाराचा पर्याय सुचविण्यात आला आहे. चुंचाळे येथील घरकुले ताब्यात देऊनही तेथे वास्तव्याला न गेलेल्या नागरिकांची कागदपत्रे तपासून काझीगढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तयारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दर्शवली आहे....
जून 23, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 07, 2019
नवी मुंबई - वाशीतील जलउंदचन केंद्रे आणि जलवितरण व्यवस्थेचे परिचालन करणे तसेच देखभाल-दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. महापालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 30, 2019
नवी मुंबई - शहरातील बहुसंख्य मॉलमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातच आपत्कालीन स्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या त्यांच्या तळघरातील जागेचा उपयोग साहित्य ठेवण्यापासून कॅन्टीन, वाहन धुणे आदी बेकायदा कामांसाठी होत असल्याने ‘ज्वालामुखी’ झालेल्या या ठिकाणी हजारो ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - कचऱ्यात आलेली तीन तोळ्यांची सोन्याची पोत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवून संबंधित महिलेला परत केली. या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सत्कार केला.  प्रभाग क्रमांक चारअंतर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक 28 मध्ये 26 जानेवारीला...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
जानेवारी 23, 2019
पिंपरी - ‘‘तुमची मुले चांगल्या शाळेत जातात. त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, असे तुम्हाला वाटते, मग महापालिकेच्या शाळेत येणारी गोरगरिबांची मुले आपलीच मुले आहेत, असे समजून त्यांना का शिकवले जात नाही,’’ असा प्रश्‍न महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘शिक्षण समृद्धी’ या कार्यशाळेत शिक्षकांना मंगळवारी...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
जानेवारी 09, 2019
पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी महापालिका व...