एकूण 50 परिणाम
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 28, 2019
‘पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
एप्रिल 16, 2019
राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार...
मार्च 25, 2019
कसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, मतांसाठी कुठल्या भागात बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे, मत विभाजनासाठी कुठले डावपेच अमलात आणले जात आहेत अशा...
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लोकसंग्रमाचे आमदार अनिल...
नोव्हेंबर 12, 2018
जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे...
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोयीसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव : सहा आमदार, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व, पालिकांवर पक्षाचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, एक खासदार अशी मजबूत स्थिती एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. मात्र हे सर्वच आता सांगण्यासाठीच राहिले आहे. आजच्या स्थितीत पक्षाचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. सहकार क्षेत्रातही फारसे वर्चस्व...
ऑगस्ट 27, 2018
कोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावर वीज तारांचे जंजाळ आहे, अपघात घडतात, जीवित हानी होते, वर्षानुवर्षांच्या तारांचा धोका कमी करण्यासाठी भुयारी वायरिंगसाठी २२ कोटींचा निधी महावितरण कंपनीकडे आला. पण महापालिकेने परवानगी दिली नाही म्हणून काम सुरू झाले नाही.  अशी स्थिती असतानाच पालकमंत्री चंद्रकांत ...
ऑगस्ट 24, 2018
कोल्हापूर - महापालिका सभागृहातील १९ नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास सर्वाधिक फटका सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार आहे. सत्तारूढ आघाडीचे संख्याबळ ३३ पर्यंत घसरू शकते; तर भाजप-ताराराणी आघाडीची सदस्यसंख्या ३३ वरून २६ पर्यंत खाली घसरेल. ऑक्‍टोबर २०१५ ला दोन्ही काँग्रेसच्या विरोधात भाजप-ताराराणी...
ऑगस्ट 14, 2018
मिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.  वेगवेगळ्या सहा जणांनी काँग्रेसचे संजय मेंढे, हारुण शिकलगार, भाजपचे निरंजन आवटी, गणेश माळी, संगीता खोत,...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव ः स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून राजकारणाची सुरवात होत असते. पण, निवडणुकीत पक्षाकडून जुन्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, महापालिकेत निवडून आलेले 75 पैकी 40 जण प्रथमच नगरसेवक म्हणून काम सांभाळणार आहेत. यामुळे हे उमेदवार महापालिकेच्या सभागृहात प्रथमच प्रवेश करतील. ...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...