एकूण 129 परिणाम
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 28, 2019
‘पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, ‘या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 02, 2019
नाशिक - ‘शत-प्रतिशत भाजप’ची हाक देताना देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या संकल्पनेला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे स्फुरण चढले आहे. त्यातूनच शहरातील पारंपरिक काँग्रेसच्या मतदारसंघांना हादरा देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. काँग्रेसकडून सातत्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एकतर...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
एप्रिल 16, 2019
राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...
एप्रिल 11, 2019
पुणे - परंपरागत मतदारांवर लक्ष केंद्रित करून भाजपला खिंडीत पकडण्याची व्यूहरचना काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. शिवाजीनगर, भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा कसबा पेठ आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस अधिक आश्‍वासक असून, याठिकाणी भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश येणार काय,...
मार्च 25, 2019
कसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, मतांसाठी कुठल्या भागात बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे, मत विभाजनासाठी कुठले डावपेच अमलात आणले जात आहेत अशा...
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
मार्च 06, 2019
अमरावती : राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा आजवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर "फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...