एकूण 85 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर- बंद घराची कडी काढून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील महिलेला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नंदिनी सिद्धेश वाकुडे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील रोकडसह सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. जिवबा नाना पार्क येथे काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला....
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर - गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. यंदाच्या उत्सवात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने अनेक नवनवीन कल्पना पुढे आलेल्या पाहायला मिळणार आहेत.  येथील स्वयम्‌ विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनीही तब्बल १२० शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये...
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार आहेत. गुरुवारी (ता. २९) पंचगंगा तालीम परिसरातील श्रीमती सीमा कबुरे यांच्या घराचे भूमिपूजन होईल. त्यानंतर निधी जमा होईल, तशी आणखी काही पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार असल्याची माहिती निवासराव साळोखे,...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 23, 2019
कोल्हापूर - न्यू करंजे (ता. राधानगरी) येथे बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या टेंपो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडला. भंगार साहित्यामागे लपवलेल्या साडेचार लाखांहून अधिकचे मद्याचे बॉक्‍स पथकाने जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक केली.  अटक केलल्या संशयितांची नांवे - राजन नारायण...
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शालेय साहित्याचा ओघ सुरु झाला. गुरुवारी (ता.22) जमा झालेले ट्रकभर साहित्य मुख्य कार्यकारी अधिकारी...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी...
ऑगस्ट 19, 2019
सटाणा : येथील 'स्वराज्य प्रतिष्ठाण कसमादे' तर्फे कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना अकरा लाख रुपयांच्या कौटुंबिक साहित्यासह विविध जीवनावश्यक गोष्टींची मदत एका ट्रकद्वारे थेट पोहीचविण्यात आली. सटाण्यातून 'आम्ही बागलाणकर' या नावाने मदतीच्या साहित्याचा ट्रक स्वयंसेवकांसह पूरग्रस्त भागात रवाना झाला होता. ...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक,...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते बदलून व त्यांना विश्‍वासात घेऊन हलवावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'लातूरच्या...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - आई दवाखान्यात ऍडमीट होती, त्याकडे आमचं सारं लक्ष होत, 3 ऑगस्टपासूनच घरापर्यंत पुराचं पाणी पोचलं. रविवारी भावाला घेऊन घरात आलो. रात्री पाणी वाढत गेलं. हाताला लागलेली चार भांडी घेऊन घर सोडलं. सात दिवस घर पाण्याखाली राहीलं. त्यात घराची भिंत पडली तर सोनारकामातील आटणीचं पाणीही वाहून गेलं. आई...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 13, 2019
सातारा - कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील सुमारे ७६० शहरे, गावांत महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाचा ‘आधार’ पूरग्रस्तांना हवा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरात जास्त तर, ग्रामीण भागात कमी मदत जाहीर करून...
ऑगस्ट 11, 2019
उदगीर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पुरामुळे मानवी जीवन उद्‌ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा सुरू झाला. उदगीरमधूनही रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. यावेळी बसस्थानकात भीक मागून जमा...
ऑगस्ट 11, 2019
सातारा ः त्यागाची, गरजूंना मदतीचा हात देण्याची कर्मवीरांची शिकवण आजही रयत शिकवण जपली जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 24 गावांमधील शाळांत पाच हजार पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला असून, त्यांना गरजेच्या साहित्यासह सर्व सुविधा शाळा आणि संस्थेच्या वतीने पुरविल्या जात असल्याची माहिती संस्थेचे...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : तब्बल सात दिवसांनी आज (रविवार) पंचगंगेची पाणीपातळी कमी झाल्याने पुणे-बंगळूर महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरात पावसान उसंत घेतली असून, पाणीपातळी काही फुटांनी कमी झाली आहे. कोल्हापूरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली असली तरी, शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थिती...