एकूण 117 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नांदेड : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यात निवडलेल्या २६ पैकी १७ गावांत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विविध विकासकामे करण्यासाठी एक हजार ४३० कामांसाठी २४ कोटी ६१ लाख रुपयांचा ग्रामविकास आराखडा मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी (ता. ११) किनवट, हिमायतनगर,...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : हवामान बदलाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केवळ प्रसिद्धीसाठी प्रयत्न होतो आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील एका गावातील युवकांनी सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमुठ आवळली. त्यांनी ‘एक झाड, एक व्यक्ती’ ही संकल्पना नुसतीच केली नाही, तर प्रत्यक्षात...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : यशवंतराव चव्हाण उत्तम वाचक, साहित्यिक होते. अशा व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसह स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले. त्यांनी कर्मवीर...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : शिक्षित व्यक्‍तीच सारेकाही करू शकतो असे समजू नका, तर अडाणी असलेल्या व्यक्‍तीही आपले ध्येय्य गाठू शकतो. माणूस कधीही वाईट नसतो. जगण्यात आव्हाने येतच असतात. जीवनाच्या प्रवासात काटे रुतले तरी थांबू नका, चालत राहा, यश तुमचेच आहे, असा प्रेमळ सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला....
नोव्हेंबर 26, 2019
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची जयताळा येथील एक शाळा. "सरकारी शाळा वाचवा आणि त्या सर्वोत्तम करा' या अभियानातील कार्यकर्ते या शाळेत पोहोचले. तिथली एक आठवीची "क्‍लासरूम'. छान-छान विद्यार्थी मज्जा करत बसलेले. त्यांनी एका स्वरात गाणे म्हणून दाखविले. कविताही म्हटली. "तुम्हाला काय आवडते तुमच्या शाळेतले?'...
नोव्हेंबर 24, 2019
बोली भाषा साहित्य संमेलन रविवारी (ता. २४) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष व खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी मुलाखतीत भाषेचा जन्म, स्वरूप, तिचे प्रकार आणि संवर्धनाच्या संदर्भात मते मांडली. बोली भाषेच्या जतन, संवर्धनासाठी...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : आयुष्य दु:खांनी माखलेले आहे. पोटाची आदवळ भरताना आडवी येणारी प्रत्येक वाट वेदनादायी आहे. यातनांच्या अंगारवाटेवरून मागील 20 वर्षे चालत ते शिक्षकधर्म निभावत आहेत. मात्र, खचून जात नाही, तर परिस्थितीशी दोन हात करत व्यवस्थेने उभ्या केलेल्या संकटांवर मात करून नवीन वाटांसाठी संघर्ष करीत आहेत....
ऑक्टोबर 30, 2019
सातारा : ती सारी मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची. वडिलांच्या जाण्याने पोरकी झालेली. साताऱ्यात कर्मवीरांच्या "रयत'ने त्यांना जगण्याचं, शिक्षणाचं बळ दिलं. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला दिवाळी साजरी करता यावी, यासाठी नव्या कपड्यांसह साहित्य आणि शिधा रयत शिक्षण संस्था आणि मुंबईच्या जे. एम....
सप्टेंबर 10, 2019
कऱ्हाड ः महापूर ओसरल्यानंतर शहरासह तालुक्‍यामध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीपासून 455 डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत त्यातील तीन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सुमारे 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एका सर्व्हेत...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
ऑगस्ट 28, 2019
लातूर : शिक्षण हा मुलांसाठी सोन्याचा पिंजरा ठरू नये. या पिंजऱ्याबाहेर जाऊन शिक्षकांना मुलांशी संवाद साधता आला पाहिजे. भाषा कधी तलवार बनते, तर कधी फुलासारखी कोमल बनते. त्यातील बारकावे मुलांना सांगता आले पाहिजेत. शिक्षकांनी आपल्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले तरच मुलांमध्ये भाषेची आणि साहित्याची गोडी...
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शालेय साहित्याचा ओघ सुरु झाला. गुरुवारी (ता.22) जमा झालेले ट्रकभर साहित्य मुख्य कार्यकारी अधिकारी...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला...
ऑगस्ट 10, 2019
कऱ्हाड ः पूरबाधीत झालेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.  पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते....
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - शिवडाव पैकी वांजोळेवाडी (ता. भुदरगड) येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून बंदुका तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरच्या गावठी बंदुका, तसेच त्या तयार करण्याचे साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...