एकूण 8 परिणाम
डिसेंबर 23, 2018
माणसाच्या भावविश्‍वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी तर झालेला नाहीच; उलट त्याचे काही पैलू नव्यानं जाणवताहेत. त्यामुळेच संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या साहित्याचा सतत अभ्यास करणं आणि वर्तमानकालीन...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
ऑक्टोबर 01, 2017
ज्या  ‘संगीतरत्नाकर’ या संगीतशास्त्रातल्या प्रमाणभूत ग्रंथाचा उल्लेख मागच्या काही लेखांत झाला, त्याचा लेखक काश्‍मिरी पंडित शार्ङगदेव याचे आजोबा दक्षिणेत आले. शार्ङगदेवाचे वडील सोढल हे सिंघण नावाच्या देवगिरीच्या राजाचे आश्रित होते. ‘संगीतरत्नाकर’ या ग्रंथात अभिनवगुप्त यांच्यासह रुद्रट, लोल्लट, उद्‌...
मे 14, 2017
इतिहासमीमांसक कसा असावा, याचा राजारामशास्त्री भागवत हे एक आदर्श नमुना होते, असं म्हणावा लागेल. भारतात इतिहासलेखनावर जातीय हितसंबंधांची छाप आणि छाया पडू न देणं अवघडच आहे. ही सिद्धी भागवतांनी साधली होती आणि हे केवळ इतिहासाच्या प्रांतापुरतं मर्यादित नव्हतं.‘भागवतांची धराच हिंमत’ असा उपदेश राम गणेश...
एप्रिल 30, 2017
‘सत्ताधारी वर्गाला सर्वच प्रजेचे प्रशासन करायचे असते; त्यामुळे एका धर्मातील लोकांबरोबर चांगले वागून इतरांशी वाईट वागणे हे त्याला परवडणारे नसतेच,’ असं प्रतिपादन श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या लेखनातून केलं आहे. ते म्हणतात ः ‘राजाचा स्वतःचा धर्म कोणताही असला, तरी त्यानं सगळ्या धर्मांच्या...
एप्रिल 16, 2017
‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या म्हणण्यानुसार ‘महाराष्ट्रीय भाषा वैदिक भाषेइतकीच जुनी आहे आणि मुख्य म्हणजे या दोन भाषांमध्ये फार पूर्वीपासून देवाणघेवाण होत होती.’ याशिवाय, त्यांचा सगळ्यात साहसी दावा म्हणजे  ः ‘ललित वाङ्‌मयाच्या क्षेत्रात महाराष्ट्री काव्यानं संस्कृत काव्यावर केवळ मोठा...
एप्रिल 02, 2017
श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जसं भाषा व धर्म यांच्याकडं लक्ष पुरवलं होतं, तसं कॉम्रेड शरद पाटील यांनीही पुरवलं होतंच आणि त्याची सुरवात अर्थातच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी करून ठेवली होती. साहसी प्रतिभावंतांच्या चुकीच्या सिद्धान्तानंसुद्धा इतिहाससंशोधनाला वेगळी दिशा मिळते....
मार्च 19, 2017
इतिहास लिहिताना पूर्वसुरींचा मागोवा घेत जावं लागतं. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर या दोन पूर्वसुरींना एका गटात समाविष्ट करता येऊ शकतं. ‘भाषा’ या मानवी इतिहासातल्या घटकाचं महत्त्व ओळखून, राजवाडे-केतकर यांच्यासारख्या पूर्वजांचा योग्य आदर करत; पण त्यांच्यापेक्षा...