एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
वसई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होईल, ही अपेक्षा नव्हती. या निवडीमुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी दिली. लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
जानेवारी 25, 2019
पुणे : "विश्वास पाटील यांनी मला दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवलं आहे ते मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाचे पत्र आहे. आमच्यात जे काही मतभेद झाले आहेत ते आजच्या कार्यक्रमात संपले आहेत,आजपासून आमची मैत्री घट्ट होईल. ज्याच्याकडे दिल असते तोच दिलगिरी व्यक्त करू शकतो पाटील...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
नोव्हेंबर 14, 2018
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
जून 03, 2018
पत्रकार, एकपात्री कलाकार, विनोदी आणि गंभीर असं दोन्ही तितक्‍याच ताकदीनं लिहिणारा साहित्यिक, ...अशा अनेकानेक विशेषणांशिवाय शिरीष कणेकर यांची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. कणेकर येत्या बुधवारी पंचाहत्तरी (6 जून 1943) पूर्ण करत आहेत. या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कणेकर यांचे सुहृद असलेले अभिनेता अतुल...
मे 17, 2018
कोल्हापूर - यंदाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे. १३ जूनला सासवड येथे पुरस्काराचे वितरण होईल. गेली २८ वर्षे हा पुरस्कार अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात आला आहे. डॉ. नलगे यांना आजवर ६४ पुरस्कार मिळाले असून, त्यांची ८६ पुस्तके प्रकाशित...
एप्रिल 14, 2018
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला. ‘इं...
मार्च 11, 2018
मिरज - महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा साहित्यिक आणि राज्यकर्ते शेपूट घालतात. बेळगावसह कर्नाटक सीमाभागाच्या वादातही हेच घडले आहे. सर्वोच्च न्यायलयात जो काही निकाल लागेल तो लागेल; पण तोपर्यंत हा भाग राष्ट्रपती राजवटीखाली आणा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस...
मार्च 11, 2018
इस्लामपूर - सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी आज येथे केले. प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा युवा पिढीला मिळायला पाहिजे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीतर्फे...
फेब्रुवारी 18, 2018
मांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा...
फेब्रुवारी 11, 2018
रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनच्या ‘जेकिल आणि हाईड’ या कादंबरीत डॉक्‍टर गॅब्रियलचे दोन चेहरे दाखवण्यात आलेले आहेत. दिवसा ‘साळसूद जेकिल’ आणि रात्री ‘दुष्ट हाईड’. दोघांना एकमेकांची नेमकी जाणीव नसते. मराठी साहित्यातही असे ‘जेकिल’ आणि ‘हाईड’ मला वेगळ्या अर्थानं अनेकदा भेटले. मी शाळेत असताना दारूवाला पुलावर...
जानेवारी 18, 2018
मुंबई - मराठीत शिक्षण घेतल्यानंतर कारकीर्द (करिअर) घडविता येत नाही... मराठीची व्यावसायिक उपयुक्तता किती...असे अनेक समज आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा समज खोडून टाकण्यासाठी मराठीतही चांगली कारकीर्द घडविता येते, याबाबत तरुणाईला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बडोदा येथे 16 ते 18...
डिसेंबर 31, 2017
मिरज - चार भिंतीच्या आतील शाळा ही संकल्पना विद्यार्थी घडवूच शकत नाही. विद्यार्थी जेवढा खुल्या वातावरणात चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिकरीत्या घडतो तेवढा कोठेच घडू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी व्यक्त केले. चैतन्य एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे. यामुळे मराठी...