एकूण 1201 परिणाम
जून 24, 2019
सोलापूर : विविध कामांसाठी घेतलेल्या उचल रकमेचा हिशेब देण्याच्या कामाला आता "सशाचा' वेग आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हिशेब देण्यास टंगळ-मंगळ करण्यात येत होती. या संदर्भात "सकाळ'मध्ये "समायोजन "कासवगतीने' ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर दोन दिवसांत तब्बल आठ कोटींचा हिशेब क्‍लिअर झाले आहे. काल सुटी...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे...
जून 23, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि...
जून 22, 2019
मंगळवेढा : पिक विमाच्या नुकसान भरपाईबाबत उंबरठा उत्पन्न फायद्याचे नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरूनसुद्धा विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई ही तुटपुंजी पडते. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या विमा कंपन्या मोठ्या होत असून अशा विमा कंपनीच्या कारभारावर सरकारने अंकुश ठेवावा, असे मत आमदार भारत...
जून 22, 2019
सोलापूर - पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी १३ जुलैला आषाढी वारीनिमित्त विविध राज्यांतून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे नियंत्रण व गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने कुंभमेळ्यातील पोलिसांना ज्या संस्थेने प्रशिक्षण दिले, त्या नाशिकच्या संस्थेकडून...
जून 21, 2019
सोलापूर : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सोलापुरातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. मंत्रिपदामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही सोलापुरात शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील जलसंधारण योजनांच्या कामांसह विविध शासकीय कार्यालयात...
जून 21, 2019
सोलापूर : ऍड. राजेश कांबळे खून खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशने केली आहे. वकील हल्ला विरोधी कायदा करावा त्याचा मसुदा तयार केला असून तो शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 20, 2019
लोणी काळभोर (पुणे) : वऱ्हाडी मंडळीच्या वेशात मंगल कार्यालयातील थेट नववधुच्या खोलीत प्रवेश मिळवून, नववधु मेकअप करण्यात गुंतल्यांची संधी साधत नववधुसाठी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या दाम्पत्यांला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (ता. 19) यवत (ता. दौंड)...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 19, 2019
सोलापूर : उजनी योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराला मंगळवारी रात्री ९ नंतर पाणीपुरवठा झाला. त्यामुळे  पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांचे जागरण झाले. सहाव्या दिवशी तेही रात्री पाणी आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उजनी जलवाहिनीला टेंभुर्णीजवळ गळती झाल्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या...
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 16, 2019
केत्तूर (जि. सोलापूर) : मुंबईहून कन्याकुमारीकडे जाणारी कन्याकुमारी एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारी (ता. 14) रात्री अकराच्या सुमारास पारेवाडी रेल्वे स्थानकावर (ता. करमाळा) क्रॉसिंगसाठी थांबली असता, गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍याला रेल्वे पोलिसांनी...
जून 14, 2019
सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही...
जून 13, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बहुतांश गावच्या रूढी आणि परंपरांमुळे त्या गावची वेगळी ओळख निर्माण होत असते. या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी,...
जून 11, 2019
सोलापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पाण्याचे राजकारण यामुळे सिना नदी काठची सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे कायम दुष्काळी राहिली आहेत. सिना भिमा जोड कालवा हा अशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात असला तरी यापासून सीने काठची उत्तर भागातील गावे वंचित आहेत. या भागातील पाणी प्रश्‍न...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
जून 08, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने आणखी साडेतीन हजार नवीन सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. ७) केली. म्हाडाच्या पुणे...