एकूण 93 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
सप्टेंबर 23, 2019
गणेशोत्सवात मैत्रिणीशी झालेल्या संवादाने अस्वस्थता आली होती, गणरायांनीच ती दूर केली होती. मुंबईच्या रौद्रभीषण पावसाची बातमी ऐकून मैत्रिणीला फोन केला. ‘‘मुले बाहेर पडणार होती; पण कंटाळा आला म्हणून घरीच बसली आणि बघता बघता पाऊस वाढला. बाहेर पडलेल्यांचे अतोनात हाल झाले गं!’’ मैत्रिणीचे बोल ऐकून माझा...
सप्टेंबर 19, 2019
ऐन तारुण्यात त्यांना अचानक अंधत्व आले. पण, न डगमगता ते डोळसपणे चालत राहिले. शेजारच्या गावातील मित्राकडे संध्याकाळी सहजच गेलो होतो. तिथे त्याची बहीण प्रभाताई व मेहुणे रमेश देशमुख यांची भेट झाली. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर. वय सत्तर. ऐन तारुण्यात डोळ्यांपुढचे जग अंधारमय झालेले. म्हणाले...
जून 28, 2019
हा निसर्ग किती काय जपून ठेवतो, लपवून ठेवतो अन्‌ अचानक उधळून देतो. त्याचाच उत्सव होतो. सुंदराचा उत्सव. गेल्या वर्षी कॉसमॉसची चार-दोन रोपे आणली. थोडी फुले देऊन ती सुकली. पण या वर्षी अचानक कॉसमॉसची रोपे उगवलेली दिसली. ते हळदुले सौंदर्य माझ्या बागेत आपोआप फुलले. प्रवासात मोह घालणारे, भंडारा उधळल्यागत...
जून 24, 2019
माझा मुलगा पराग दहावीच्या परीक्षेचा क्रमांक पाहायला शाळेत गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही. आम्हाला वाटले, मित्राकडे गेला असेल. मात्र खूपच उशीर होत गेला आणि आमची चिंता वाढली. त्याला शोधायला मी स्कूटरने निघालो. शाळा, वर्गमित्र, शेजार-पाजार, मित्रमंडळी सर्वांना विचारले, पण कुठूनच काहीच...
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
जून 03, 2019
ज्येष्ठत्वात आठवणींशी निगडित असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मन अस्वस्थ होते. आठवणींचा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो. लहानपणी वह्यांवर एकतरी सुविचार लिहिण्याची पद्धत होती. सुविचारही बालिशच असायचे. ‘आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली तरी महती...
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
मार्च 14, 2019
काळ बदलतो. आपण बदलतो. आपली कर्तव्ये बदलत जातात आणि मग आपापल्या भूमिकाही उलटसुलट होतात. बदलत्या काळासोबत बऱ्याच गोष्टी बदलत जातात. नव्या आणि जुन्या पिढ्यांच्या विचारांची, मतांची देवाण-घेवाण होते. अडचण होणारे जुने जाते, सुलभशा नवीन परंपरांचा आनंदाने स्वीकार होतो. काही गोष्टी झटक्‍यात बदलतात, तर काही...
फेब्रुवारी 27, 2019
खाद्या माणसाने आपल्याला मदत करून दिलासा दिला तर त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत राहते. ती व्यक्त झाली तरच आपले भाव त्या व्यक्तीपर्यंत पोचतील. त्या व्यक्तीची तशी अजिबात अपेक्षा नसतेसुद्धा, पण ते व्यक्त करणं ही आपलीही भावनिक गरज असते. आज मला अशाच एका व्यक्तीबद्दलची माझी कृतज्ञता जाहीररित्या व्यक्त...
फेब्रुवारी 17, 2019
बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होवून...
फेब्रुवारी 06, 2019
माझा मुलगा त्याच्या कुटुंबासह जपानमध्ये असतो. एकदा रात्री त्यांच्या एका मित्राने माझ्या मुलाला त्याच्या घरी कॉफीसाठी बोलावले. तिकडे रात्रीचे अकरा वाजले असतील. मुलांना घरीच ठेवून ती दोघे मित्राकडे गेली. जाता जाता माझ्या मुलाने आम्हाला इकडे पुण्यास फोन केला. तेव्हा इथे संध्याकाळचे साडेसात वाजले होते...
जानेवारी 30, 2019
त्या कुटुंबाने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मदत केली वळवाच्या पाऊसराती. कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले....
जानेवारी 30, 2019
कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले. प्रत्येक जण त्याला आपल्यापरीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण बाळ काही...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
नोव्हेंबर 08, 2018
जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर... प्रिय पु.ल., तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते, तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी...
ऑक्टोबर 26, 2018
देवदर्शनाला गेलेले असताना एका माकडाने हातातील पिशवी पळवली आणि नंतर त्यातील सोनसाखळी मिळविण्यासाठी सुरू झाले प्रयत्न... त्र्यंबकेश्‍वरला कुलदैवताच्या दर्शनाला गेलो होतो. गप्पागोष्टी रंगल्या होत्या. ध्यानीमनी नसताना अचानक एक माकड उड्या मारीत आले व क्षणार्धात माझ्या कन्येच्या हातातील सोनसाखळीची डबी...
सप्टेंबर 27, 2018
पोलिसांकडून वाईट अनुभव येतात तेव्हा खूप जोराने बोलतो आपण; पण त्यांच्याकडून चांगले अनुभव येतात, त्या वेळीही बोलले पाहिजे.  चार दिवस जोडून सुटी आल्यामुळे निवांत वेळ घालविण्यासाठी गावाकडल्या घरी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच फोन खणाणला. माझ्या सांगवीतील घराशेजारी राहणाऱ्या काकूंचा फोन होता. ‘‘गौरव...
सप्टेंबर 11, 2018
उत्सवातील उत्साह अजून तोच आहे; पण पूर्वीचा उत्सवातील सक्रिय सहभाग कमी होत चालला आहे. लहानपणापासून बरेच गणेशोत्सव बघितले, उत्सवाचे स्वरूप बदलले; पण बालपणीचा ब्राह्मण आळीतील गणेशोत्सव विशेष आठवतो. गणेशोत्सव आला, की देखाव्यांची तयारी होत असे. वरच्या आळीत मांडव पडायचा. आधीच दहा दिवस देखाव्याची जमवाजमव...
जुलै 31, 2018
माणूस आठवणीत रमणारा प्राणी आहे म्हणतात. फुटबॉलचे सामने पाहताना मीही माझ्या शाळा-महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींत रमलो. रमणबाग शाळा आणि फुटबॉल यांचे नाते अतूट होते. रामभाऊ लेले हे क्रीडाप्रेमी शिक्षक क्रिकेट, फुटबॉल व हॉकीने शाळेचे वातावरण भारून टाकीत असत. ते स्वतः उत्तम कोच तर होतेच, पण...