एकूण 373 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 10, 2019
खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करणे, वायुमय ग्रहाचा शोध आणि अनेक व्याधींवरील नवी औषधे, अशा विविधोपयोगी संशोधनांवर ‘नोबेल’ निवड समितीने यंदा पुरस्काराची मोहोर उमटवली आहे. जीवनात आवश्‍यक असलेल्या तीन गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तथापि, जीवन जगायचं असेल, तर प्रथम प्राणवायू आणि पाणी पाहिजे. जीवन...
ऑक्टोबर 09, 2019
भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल.  महाराष्ट्र...
ऑक्टोबर 05, 2019
यंदाची विधानसभा निवडणूक विशिष्ट मुद्द्यांपेक्षा बेदिली आणि बंडखोरीमुळे गाजू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली तेव्हा भाजपसह सर्वच पक्षांत ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नी खांद्यावर घेतलेले बंडाचे झेंडे राज्यभरात फडकू लागले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या...
ऑक्टोबर 03, 2019
महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत सहभागी असूनही गेली पाच वर्षे विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून ‘आमचं ठरलंय!’ या एकाच वाक्‍याचा धोशा लावला होता. प्रत्यक्षात बरीच ‘भवति न भवति’ झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना...
ऑक्टोबर 02, 2019
मानवी हाव किंवा लालसा नियंत्रणासाठी शासनसंस्था हे माध्यम असू शकेल, असे कार्ल मार्क्‍स यांना वाटत होते, तर गांधींजींच्या मते माणसाची सद्‌सद्‌विवेक किंवा अंतरात्म्याची प्रेरणा त्याकामी उपयोगी पडेल. तशी साद घालण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्माजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 22, 2019
तेलंगणला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागांतील बांधवांना परराज्यात जावं वाटणं ही भावनाच स्थानिक राजकारणाचं अपयश दाखविणारी आहे. विकासाचा अजेंडा पुढं करत हैदराबादेतील तेलंगण राष्ट्र समितीची ‘ॲम्बेसिडर’ महाराष्ट्रात घुसू पाहत आहे. तसं झालं तर राज्याच्या राजकीय पटावर ‘मेड इन हैदराबाद’चा टॅग...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 20, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांना अपेक्षित यश येत नव्हते. राज्याच्या राजकारणावर सहकाराच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राने नेहमीच घट्ट पकड ठेवली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व ठेवले, तर ग्रामीण भागात शिवसेनेने हळूहळू आपली...
सप्टेंबर 14, 2019
देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीविषयी अर्थतज्ज्ञांनी काळजीचा सूर लावला असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनातही त्याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे. एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न, तर दुसरीकडे सध्याचा जेमतेम पाच टक्के विकासदर आणि बांधकाम, वाहन उद्योगात आलेली मरगळ हे चित्र...
सप्टेंबर 12, 2019
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे. अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत...
सप्टेंबर 10, 2019
पहिल्या शंभर दिवसांत धडाक्‍याने निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यात तथ्य असले तरी हे निर्णय प्रामुख्याने राजकीय क्षेत्रातील आहेत. आर्थिक आघाडीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार काय करीत आहे, याबाबत स्पष्टता नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या...
सप्टेंबर 05, 2019
केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘वेतन संहिते’मुळे देशातील रोजगारसंधी वाढणे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय मालाची स्पर्धात्मकता वाढविणे साध्य होणार आहे. उद्योगस्नेही वातावरण तयार होण्याच्या दृष्टीनेही ही वेतनसंहिता विधायक परिणाम घडवेल.  कोणत्याही आधुनिक राष्ट्राच्या कायदा व्यवस्थेमध्ये आर्थिक...
सप्टेंबर 02, 2019
जळगावातील घरकुल गैरव्यवहाराच्या खटल्यात धुळ्याच्या सत्र न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. लोककल्याणाच्या नावावर राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांमधील भ्रष्टाचाराला, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते सुरेश जैनांच्या रूपाने गेली चार दशके खानदेशात सुरू असलेल्या राजकीय दादागिरीला या...
सप्टेंबर 01, 2019
ऍमेझॉनच्या जंगलात लागलेला वणवा ही फक्त घटना नसून, मानवजातीच्या सुनिश्‍चित होणाऱ्या भविष्याचा आरसा आहे. ते नक्कीच भयावह आहे. जे जंगल पृथ्वीवरील एकूण ऑक्‍सिजनच्या 22 टक्के ऑक्‍सिजन निर्माण करते, ते विकासाच्या नावाखाली जाळणे ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी...
ऑगस्ट 31, 2019
महाराष्ट्र माझा : मुंबई विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही, तरी भाजपचे आजघडीला नुकसान होणार नाही, उलट फायदा होण्याचीच शक्‍यता जास्त. तरीही स्वतःहून युतीला तयार झालेला भाजप या वेळी शिवसेनेला किती जागा देणार, हाच या निवडणुकीतला सर्वांत मोठा, खरे तर, एकमेव प्रश्‍न आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे दिवस. ‘...
ऑगस्ट 31, 2019
महाराष्ट्र माझा : मराठवाडा  यंदा मराठवाडा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या योजना प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा या आठवड्यात मराठवाड्यात आहे...
ऑगस्ट 29, 2019
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात पालघर तालुका (आता जिल्हा) होता. मच्छीमार, आदिवासी, कोळी, आगरी, भंडारी  आदी जाती-जमातींचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते, अशी नवनीतभाई शहा यांची ओळख. भाईंनी आपला व्यवसाय सांभाळतानाच संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनात...
ऑगस्ट 27, 2019
बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा सिंधूच्या विजयामुळे अखेर फळाला आली आहे. सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच; पण ते विजिगीषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे. भारतातील २४ वर्षांची एक युवती आणि भारतातील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा स्मार्टफोनवरचा कुठलाही गेम...