एकूण 254 परिणाम
जून 25, 2019
पुणे : पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील, त्यामध्ये नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नयेत, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. हा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनाच असल्याची शक्यता आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज...
जून 21, 2019
कोल्हापूर - निर्भया पथकाने धडक कारवाई करत आज टवाळखोरांना हिसका दाखवला. महावीर, कॉमर्स कॉलेजसह केएमटी, एस.टी.बसमध्ये तरुणींना छेडणाऱ्या टवाळखोरांना पकडून त्यांचे पालकांसमोर समुपदेशन केले. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रोमिओंवर कारवाई केली.  महाविद्यालय सुरू झाल्याने टवाळखोरांचे घोळके...
जून 13, 2019
बारामती : येथील तालुका पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या बॉंड उर्फ संतोष दत्तात्रय अडागळे गँगला मोका लावला आहे. बारामती उपविभागातील मोकाची ही सलग नववी कारवाई असून आजपर्यंत पोलिसांनी मोका अंतर्गत तब्बल 76 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक धन्यकुमार...
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव...
जून 10, 2019
पुणे : घोले रस्त्यावर सोमवारपासून चक्राकार वाहतूक सुरू केली आहे. फर्ग्युसन रस्ता ते महात्मा फुले संग्रहालय या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. घोले रस्त्यावर याआधी दुहेरी वाहतूक होती पण, वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहे. आज पहिला...
जून 09, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत झालेल्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफूटप्रकरणी शनिवारी (ता. आठ) येथील फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध विद्यापीठ कायदा 1982 च्या कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर प्रभू बोरे व आशीष एस. राऊत, अशी गुन्हा दाखल...
जून 01, 2019
पुणे : जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविणारा नामांकित जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. शुक्रवारी दुपारी एक वाजता कोथरूड येथे ही घटना घडली. मोबाईलच्या हट्ट्पायी साहिलने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
मे 22, 2019
पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खाताना त्यामध्ये काचेचे तुकडे निघाल्याने एका ग्राहकाच्या घशाला जखमा झाल्याची घटना बुधवारी (ता.१५) दुपारी घडली. संबंधित ग्राहकाच्या मित्रांनी बर्गरची पाहणी केली, त्या वेळी त्यात काचेचे तुकडे आढळले. ग्राहकाने उपचार घेतल्यानंतर डेक्कन...
मे 07, 2019
पुणे - शहरात सकाळी सकाळी दुचाकीवरील साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते साडेआठ या अवघ्या दीड तासांमध्ये वानवडी, विश्रामबाग, समर्थ, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तीन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. या...
एप्रिल 30, 2019
जळगाव - खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या संशयित आरोपीला प्रकृती खराब झाल्याचे सांगून जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, संबंधित संशयित आरोपीच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डातच काल मद्यप्राशन करीत रात्री जोरदार पार्टी केल्याची माहिती...
एप्रिल 25, 2019
अकोला : वाढत्या नागरिकरणामुळे दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मानवी जीवनासाठी वाढते ध्वनी प्रदूषण हे मोठ्याप्रमाणात घातक असले तरी आजही या संदर्भात पुरेसी जनजागृती प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी शहरात मोठ्याप्रमाणा ध्वनी...
एप्रिल 09, 2019
पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - कर्वे रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी महामेट्रोने अखेर पावले उचलली आहेत. वनाज- रामवाडी मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असताना बॅरीकेडस दूर करण्यास महामेट्रोने मंगळवारपासून सुरवात केली. कर्वे आणि पौड रस्त्यावरील बॅरीकेडस मार्चअखेरपर्यंत काढणार आहे. ...
फेब्रुवारी 25, 2019
धानोरा - आष्टी तालुक्‍यातील धानोरा येथे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी बाहेरगावातील व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी येत आहेत. मात्र, विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून...
फेब्रुवारी 23, 2019
कऱ्हाड - सैदापूर कृष्णा कॅनॉल चौकात वाहतुकीचा ताण असताना वाहतूक नियंत्रणापेक्षा वाहतूक पोलिस कारवाईत मग्न असल्याने कोंडीमध्ये अधिक भर पडते. त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत कारवाईपेक्षा वाहतूक नियंत्रणाला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. वरिष्ठांनीही त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : शाहू महाविद्यालयाच्या परिसरात बॉंबस्फोट करण्याचा ई-मेल आल्यामुळे शहर पोलिसांची बुधवारी दिवसभर धावपळ उडाली. दक्षतेचा इशारा म्हणून पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. सुदैवाने त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही. हा ई-मेल म्हणजे खोडसाळपणा असावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने २४ फेब्रुवारीपर्यंत शहरात ‘पुणे स्मार्ट वीक’चे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, घोले रस्त्यावरील नेहरू सभागृह व पंडित राजा रवी वर्मा कलादालन, संभाजी उद्यान, शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाचे मैदान या ठिकाणी सांस्कृतिकसह विविध...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील कायदा व्यवस्था...