एकूण 141 परिणाम
जून 13, 2019
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आज (13 जून) आपल्यातून जाऊन पन्नास वर्षे झाली. तरीही, जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात ढोंगबाजी, खोटेपणा जाणवतो; तेव्हा तेव्हा अनेक जण "आज आचार्य अत्रे असते तर?' असे उद्‌गार काढतात. विनोदाचा अस्त्र म्हणून प्रभावी वापर करणाऱ्या अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्से. ...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे.  सार्थकने...
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य सरकारकडून त्यांचे...
एप्रिल 17, 2019
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. शरद साठे यांनी १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर...
एप्रिल 12, 2019
मुंबई - आकर्षक दिसणारी जोडीदार हवी, आपल्यापेक्षा जास्त पगार असल्यास आणखी चांगले; हा पैसा कुटुंबातच येईल, हे ‘हिशेबी’ नवमत आहे मुंबईतील १७ ते २१ वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे! विद्यार्थिनींनी देखणा आणि आपल्यापेक्षा जास्त पगाराचा जोडीदार हवा, अशी भूमिका  कायम ठेवली.  महाविद्यालयीन...
एप्रिल 04, 2019
साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
मार्च 05, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील भिवंडी वाडा रस्त्यावरील मध्यवर्ती बाजार पेठ असलेली आनगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम शेलार, व उपसरपंच राजाराम राऊत यानी सतत शासन दरबारी येथील पाणी प्रश्न बाबत सतत पाठपुरावा करून अखेर खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने आनगांव ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून...
जानेवारी 31, 2019
मुंबई - विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. परंतु, या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्याचे नाव, विषय, माध्यम आदी अनेक चुका असल्याचे उघड झाले आहे. या चुकांच्या दुरुस्तीसाठी काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून 50 ते 200 रुपये शुल्क...
जानेवारी 30, 2019
मुंबई - मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत महानगरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक  प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी ३२३ कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण...
जानेवारी 28, 2019
उस्मानाबाद : सुपर स्पेशालिटी शिबीरातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. (ता. 28) जिल्हा रुग्‍णालयातुन या मुलांना पाठविण्यात आले असुन 18 व 19 जानेवारीला भव्य सुपर स्पेशालिटी आरोग्य मेळावा घेण्यात आला होता. त्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग...
जानेवारी 14, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) - गुंडप्रवृत्तीमुळेच ‘निमंत्रण वापसी’चा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. या निर्णयामुळे दुःखी झाले. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी खडे बोल सुनावले. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमातच्या शाळेत...
जानेवारी 05, 2019
सांगली : इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक प्रा.चारुदत्त अच्युत भागवत (वय 68) यांचे आज पहाटे मुंबई येथील खासगी इस्पितळात निधन झाले. किरकोळ दुखापतीसाठी त्यांना मुंबईत उपचारासाठी नेले असता गेले काही दिवस न्यूमोनियाने ते त्रस्त होते. आठ वर्षा पूर्वी त्यांना अंत्यत दुर्मिळ आणि दुर्धर अशा जीबी...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
नोव्हेंबर 23, 2018
हुंकार सभेला स्थगिती देण्यास नकार नागपूर : विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या वतीने 25 नोव्हेंबरला आयोजित हुंकार सभेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्याचवेळी पोलिसांनी टाकलेल्या अटींच्या अधीन राहून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेशही...
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही धावतात. पण जळगावसाठी मॅरेथॉनचे कल्चर जरा नवीन आहे. मात्र, याची हळूहळू सवय लागली आणि जळगावकर धावू लागले आहेत. मुख्य म्हणजे यात महिला देखील मागे...
नोव्हेंबर 10, 2018
नांदेड : प्रेमसिंग चव्हाण, सिनियर प्रोफेसर यशवंत महाविद्यालय हे मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्सप्रेसने  बी-1 /25 या  बर्थवर नांदेड ते किनवट असा प्रवास करत होते. त्यांना सहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली एक पांढरी बॅग सापडली.  सोन्याचे दागिने होते त्यांनी ही  बेग किनवट रेल्वे स्थानकावर...
ऑक्टोबर 28, 2018
विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! सर्वसाधारणपणे प्रत्येक...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...