एकूण 2541 परिणाम
जून 25, 2019
मुंबई: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील तीन एकर प्लॉटसाठी एका जपानी कंपनीने जबरदस्त ऑफर दिली आहे. जपानच्या सुमिटोमो या कंपनीने बीकेसीतील प्लॉटसाठी तब्बल 2,238 कोटी रुपयांची बोली लावली आहे. म्हणजेच 745 कोटी रुपये प्रति एकर या दराने हा प्लॉट विकत घेण्याची या कंपनीची तयारी आहे. एका इंग्रजी...
जून 25, 2019
नवी मुंबई  - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून...
जून 25, 2019
पुणे - वडील आणि आई अधिकारी असून, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची खोटी माहिती सांगून बॅंक कर्मचाऱ्याने मैत्रिणीबरोबर केलेले लग्न न्यायालयाने बेकायदा ठरविले.  दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायाधीश किशोर पाटील यांनी हा निकाल दिला. राजश्री आणि महेश (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
नवी दिल्ली : 'मेट्रो मॅन' या नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या पद्मविभूषण ई. श्रीधरन यांनी लखनौ मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एलएमआरसी) मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ते प्रतिष्ठित दिल्ली मेट्रोचेसुद्धा अध्यक्ष...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 24, 2019
चिपळूण - बहादूर शेख नाका येथील क्वालिटी बेकरीत आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन महिला कामगार जखमी झाली. स्फोटाच्या तीव्रतेने इमारतीचा काही भाग कोसळला. बेकरीमधील साहित्याचेही नुकसान झाले. या महिलेला तातडीने उपचारासाठी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सरिता सावर्डेकर (वय...
जून 24, 2019
नागपूर : आदिवासी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना विम्याचे संरक्षण देण्याचा विचार आहे. सर्व योजनांसाठी डीबीटी लागू करू, अशी माहिती नवनियुक्त आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली. राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्याचे प्रथमच नगरागमन झाले. फडणवीस...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव...
जून 23, 2019
कोल्हापूर - रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला प्रदूषण मात्र तलावाची काही साथ सोडत नसल्याचे चित्र आहे. परताळ्यातील कुजलेले पाणी थेट तलावात मिसळत असून, काळ्याकुट्ट पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे. रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या तीन नाल्यांतून सांडपाणी...
जून 22, 2019
नागपूर : त्रिमूर्ती नगरातील सरस्वती विहार कॉलनीमधील पुलाचे बांधकाम करताना मनपा ठेकेदारांनी दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी तोडल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना ठेकेदाराने जलवाहिनी तोडल्याने शेकडो लिटर पाणी...
जून 22, 2019
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील दोन सभापतींवर अविश्‍वास पारित झाल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) सभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात भाजप-शिवसेनेने खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा "गेम' केला असून, दोन्ही सभापतिपदे शिवसेनेकडे गेले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर आणि...
जून 22, 2019
मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल...
जून 22, 2019
पुणे - पालखी तळांवरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्व हायमास्ट दिव्यांची भक्‍कम उभारणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. या कामासह अन्य सुविधांबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी येथील अध्यक्ष निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्याचा निर्णय फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय सभेत घेतला होता. त्यानुसार आता हलचाली गतिमान झाल्या असूृन, तब्बल २२ कोटींचा आराखडा बनविला आहे. त्यातून २१० गाळे उभारले जाणार असून...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
सिरोंचा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍याच्या तीनही बाजूंनी इंद्रावती, प्राणहिता, गोदावरी या प्रचंड मोठ्या व बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने प्रचंड मोठा मेडीगड्डा सिंचन प्रकल्प पूर्ण केला आहे. मात्र, तालुक्‍यातील...
जून 21, 2019
सोलापूर - तीव्र उन्हाळ्याने धरणे तळाला गेली आहेत, विहिरी आटल्या आहेत. पाण्यासाठी माणसे दाहीदिशा फिरत असताना साताऱ्याजवळची लिंब गावातील इतिहासकालीन बारा मोटेची विहीर गेली ३०० वर्षे कधीच आटली नाही. सन १७१९ मध्ये बांधकामाला सुरवात झालेल्या या विहिरीला ३०० वर्षे झाली आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ही...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 21, 2019
मुंबई - वाळूउपसा आणि लीलावाचे तसेच विक्रीचे सर्वाधिकार खणिकर्म महामंडळाला देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने आज गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली. वाळूउपशामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत लक्षवेधी आमदार विनायक मेटे यांनी परिषदेत मांडली....