एकूण 291 परिणाम
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 05, 2019
नागपूर - बुटीबोरी येथील भूखंड गैरप्रकार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून माजी खासदार विजय दर्डा व इतरांविरुद्ध चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती एसीबीने मुंबई उच्च...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित...
मे 03, 2019
कोल्हापूर - ‘पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, बांधकामाला कोण अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी वेळ पडली तर काहीही करू,’ असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. पुरातत्त्व विभागाने शिवाजी पुलाच्या बांधकामाला घेतलेल्या हरकतीनंतर त्यांनी...
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
एप्रिल 12, 2019
मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. (यूपीएल) कंपनीच्या कार्यालयात बेकायदा भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणल्यानंतर भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे संबंध किती घनिष्ठ आहेत, याचे नवनवीन पुरावे समोर येत आहेत....
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - शेती विषयक अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. पण तरीही खासदार राजू शेट्टी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आरे-तुरे करतात. त्यामुळे श्री. शेट्टी यांच्यावर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रचंड राग आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना पाडणारच आहे, असे महसूल मंत्री...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल चार कोटी ७४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या कर्जात तब्बल चार कोटींची वाढ झाली आहे, तर त्यांच्या वैयक्तिक नावावर १ कोटी ९४ लाख रुपये किमतीची १७ वाहने आहेत. श्री. महाडिक...
एप्रिल 01, 2019
उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील...
एप्रिल 01, 2019
महात्मा गांधींचे वास्तव्य राहिलेल्या जिल्ह्यात काँग्रेसला अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. उमेदवार मोठ्या संख्येने असल्याने मतविभाजनाचा धोका आहे. त्यावर कोण कशी मात करेल, हे पाहणे रंजक असेल. वर्धा लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. खासदार रामदास तडस (भाजप) आणि ॲड. चारुलता टोकस...
एप्रिल 01, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांत "मार्च एंडिंग'चा फिवर गेल्या पंधरा दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. यात दोन दिवसांपासून वाढ झाली असून, आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थ विभागासह कोषागार विभागात दिवसभर काम सुरू होते. जि.प.च्या अर्थ विभागात आज विविध विभागांतून कामांची बिले सादर करण्यात...
मार्च 30, 2019
पुणे- वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठी नदीपात्रात केवळ खांब (पिलर) उभारण्यास राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) परवानगी दिली आहे. मात्र, खांबांसह अन्य स्वरूपाचे बांधकाम आणि राडारोडा टाकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील राडारोडा काढा आणि तोपर्यंत...
मार्च 29, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे. शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. मुंबईतील ‘म्हाडा’चा फ्लॅट विकल्याने संपत्तीत वाढ झाल्याचे शेट्टी यांनी या...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. पंचतारांकित हॉटेल सयाजीमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे आगमन झाले.  आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते....
मार्च 21, 2019
कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांनी होळीचा मुहूर्त साधत दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे जाहीर सभा होत...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...