एकूण 300 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
अमरावती :  बांधकाम व्यावसायिकास पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. 12) रात्री अटक करून दोघांविरुद्ध रविवारी (ता. 13) खंडणीचा गुन्हा दाखल केला. मोहंमद रेहान वल्द फदूल रहेमान (रा. पॅराडाइज कॉलनी) व शुभम प्रेमकिशोर मुझरे (रा. विनसपार्क कॉलनी) अशी अटक...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला...
सप्टेंबर 30, 2019
चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 27, 2019
रायगड : पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावर चढलेल्या महिलेला वाहतूक पोलिसांनी शिताफीने वाचविल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी माणगाव येथे घडली. विशाल येलवे आणि योगेश मदने असे या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. माणगाव...
सप्टेंबर 27, 2019
रोहा : रोहा तालुक्‍यात सर्प व विंचूदंशाच्या घटनांत गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. तालुक्‍यातील विकासकामे व सापांच्या अधिवासावर अतिक्रमण हे याचे प्रमुख कारण आहे. २०१५-२०१६ या वर्षात रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्पदंश रुग्णांची संख्या ६० होती; तर विंचूदंश झालेल्या रुग्णांची...
सप्टेंबर 26, 2019
वसई ः वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वसई-विरार महापालिकेने उड्डाणपुलाची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला असला, तरी बेसुमार वाढत असणाऱ्या वाहनांसाठी शहरात वाहनतळ नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागेअभावी वाहने कुठेही आणि कशीही उभी...
सप्टेंबर 26, 2019
टिटवाळा : उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद करण्यास पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करताच या कारखानदारांनी नजीकच्या कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्थलांतर केले. येथील जागामालकांना भरघोस रकमेचे भाडे देण्याचे प्रलोभन दाखवत या जिन्स कापड बनविणाऱ्या कारखानामालकांनी ग्रामीण...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : वडखळ-अलिबाग या २२ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. त्यासाठी १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला होता; परंतु निधीअभावी तो दुपदरी करावा, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी...
सप्टेंबर 23, 2019
पालघर ः पालघर नगरपालिकेने गेले दोन दिवस माहीम व मनोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केल्या. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असतानाच आज मोकळ्या झालेल्या जागेवर परप्रांतीय फळ-भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या लावून पुन्हा कब्जा केला आहे. त्यामुळे हे...
सप्टेंबर 23, 2019
कारण अगदीच किरकोळ.. पोलिसांत तक्रार केल्याचं. त्यावरून राग इतका अनावर व्हावा की, दोन-चार जणांनी मिळून भर रस्त्यात, दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. एकीकडे महामार्ग, शहरातील रस्त्यांवरून वापरणं अन्‌ पर्यायानं जगणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे, गुंडांच्या दहशतीनं जीव अगदीच स्वस्त....
सप्टेंबर 21, 2019
जळगावात बांधकाम ठेकेदाराचा भरदिवसा खून  जळगाव : शहरातील खेडी पेट्रोल पंपा जवळ आज सकाळी एका बांधकाम ठेकेदाराचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.  या संदर्भात अधिक असे की,  खेडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी ९ ते ९:३०...
सप्टेंबर 20, 2019
 खारघर : खारघरमध्ये अनधिकृतपणे झोपड्या आणि शेड उभारून वराहपालन केले जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. खारघर सेक्‍टर- १६ मधील मलनिःसारणच्या मागील बाजूस असलेल्या सिडकोच्या राखीव जागेवर काही जण अनधिकृत झोपड्या...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर  : शहरातील हायटेंशन लाइनच्या जवळ किती शाळा, कॉलेज अवैध आहेत. तसेच किती बांधकाम अवैध आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने पाहणी करावी. तसेच मनपा किंवा नासुप्रकडून अवैध बांधकामांविरुद्ध काय कारवाई करण्यात येत आहे, याबाबत माहिती द्यावी. असे आदेश नागपूर...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम...
सप्टेंबर 18, 2019
वसई ः वसई-विरार महापालिकेने उद्यान सुशोभित करताना लहान मुलांसाठी खेळणी, नागरिकांना व्यायामासाठी खुली व्यायामशाळा सुरू केली; मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या या साधनांची अवस्था बिकट असून याचा नागरिकांना लाभ घेता येत नाही, तर बसवण्यात आलेल्या साधनांच्या ठिकाणीच पावसामुळे चिखलाचे...
सप्टेंबर 16, 2019
पनवेल : कळंबोली ते नावडे फाटादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या प्रवासाकरीता अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या...