एकूण 274 परिणाम
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 13, 2019
नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूड पार्कची विकासकामे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या, उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने मशीनही आयातही केली. मात्र, आर्थिक अडचण आणि तांत्रिक बाबीमध्ये प्रकल्प अडकला आहे. पतंजलीने मिहान प्रकल्पात फूड पार्कसाठी 234 एकर जागा...
मे 14, 2019
औराद शहाजानी - जलयुक्त शिवारमधून जलसंधारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या हलगरा (ता. निलंगा) गावातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. दुष्काळामुळे गावात घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. टॅंकरचे पाणी आडातून शेंदून घेताना सर्वांना तारेवरची कसरत...
एप्रिल 17, 2019
नागपूर -  गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीला 22 जुलैला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिवसाची भेट दिली जाणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या प्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला हिरवा कंदील दिल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.  गोरेवाडा...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
मार्च 14, 2019
जळगाव - राज्यातील भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘हनुमान’ म्हणून आता संपूर्ण राज्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ओळख झाली आहे. महापालिका निवडणुकांनंतर लोकसभेची जबाबदारीही त्यांच्यावर असून लोकसभेत कमकुवत असलेल्या मतदार संघात पक्षाचे भक्कम उमेदवार देण्यासाठी...
मार्च 03, 2019
रत्नागिरी - जनतेच्या दबावाला समंजस प्रतिसाद देऊन अधिसूचना रद्द केली असावी. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक प्रकल्पातून रोजगार संधी मिळाल्या पाहिजेत. विकासाची दिशा मिळाली पाहिजे. त्यामुळे हा प्रकल्प गुहागरमध्ये घ्यावा. तिथल्या लोकप्रतिनिधी, जनतेने या प्रकल्पाची व्याप्ती समजून घ्यावी....
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने...
फेब्रुवारी 18, 2019
पंढरपूर : मराठा समाज आरक्षण आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत बसेस फोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.   यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी,...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - ऊन-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब असुरक्षिततेच्या टांगत्या तलवारीखाली पोलिस वसाहतींमध्ये राहत आहेत. आपल्या बायका-मुलांना घरी ठेवून कर्तव्यासाठी ऑनड्युटी 24 तास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसदादांना आपले कुटुंबीय घरी सुरक्षित असतील ना, अशी चिंता रोजच...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी 125 कोटींचा निधी जाहीर करून तीन आठवडे उलटल्यानंतरही महापालिकेतर्फे यादी अंतिम होऊ शकली नाही, अशा शब्दांत शिवसेनेवर निशाणा साधत भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शुक्रवारी (ता. एक) पक्षातर्फे 30 रस्त्यांची यादी महापौरांना सादर...
जानेवारी 12, 2019
आटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले असल्याची...
जानेवारी 08, 2019
मुंबई - नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध बॅंकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते....
जानेवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे...