एकूण 270 परिणाम
जून 18, 2019
मिरज - वाहनांनी गजबजलेला शिवाजी रस्ता, त्यातून भरधाव धावणारा मालवाहू ट्रक आणि त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करणारा वाहतूक पोलिस. मिरजेतील शिवाजी रस्त्यावर आज सकाळी अकरा वाजताचे हे दृश्‍य. अवघ्या मिरजकरांनी स्वतःचा जीव मुठीत धरून ही शर्यत पाहिली.  पंढरपूर रस्त्यावरून येऊन शहरात प्रवेश करणाऱ्या...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
एप्रिल 24, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी वज्रेश्वरी उसगाव हा रस्ता एमएमआरडीएकडे असताना कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होता व रस्त्याची अक्षरशः चालणं मुश्किल झाले होते. मात्र सार्वजनिक उपबांधकाम विभाग ठाणे यांना हस्तांतरित केल्यावर येथील रस्ता चकाचक करणयात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात...
मार्च 19, 2019
पुणे - पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाठोपाठ आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये आता उंच इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पाच मजल्यापर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यांपर्यंत करण्यात आली आहे.  त्याच प्रमाणे रस्तारुंदीनुसार...
मार्च 13, 2019
पुणे - ट्रान्झिट ओरिऐटेड डेव्हलपमेंट (टीओडी) झोनसंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये गोंधळ असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच मूळ नियमावलीत महापालिका प्रशासनाने साध्या प्रस्तावानुसार अनेक बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. याचबरोबर या झोनमध्ये हस्तांतरीय...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली.  सततच्या...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - सहा ते नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधकामांना परवानगी देण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या पातळीवरील गोंधळाचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. नऊ मीटर रस्ता गृहीत धरून बांधकाम नकाशांना मंजुरी दिली जाते. परंतु त्याच बांधकामांवर विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) अथवा...
जानेवारी 25, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणेशपुरी येथील गावदेवी ते गांधीपाडा दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून, या रस्त्याच्या ठेकेदाराने गटारी अपूर्ण अवस्थेत सोडून देखील आपले बिल पास करून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या तीर्थक्षेत्री...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
डिसेंबर 21, 2018
वेल्हे - छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व शेवटची राजधानी रायगड. या दोन्ही राजधानींना जोडणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरील वेल्हे तालुक्‍यातील अडीचशे लोकवस्तीची ऐतिहासिक ‘रायदंडवाडी’. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या २५० लोकसंख्येच्या वाडीत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे...
डिसेंबर 06, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे जाऊन खराब झाला. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही चौकशी केली नाही. यामुळे सांबांधित विभागाच्या ठाणें येथील...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली. गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे देखील...
नोव्हेंबर 16, 2018
उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.  पाल यात्रा...
ऑक्टोबर 31, 2018
मांजरी - येथील ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातून शेवाळेवाडी गावात जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएने हा रस्ता खुला करण्याचा आदेश देऊनही अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने दाखल याचिकेत महापालिकेने ता. दोन नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरवात करावी, अन्यथा शंभर कोटींचा निधी शासन परत घेईल. त्याचप्रमाणे रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांनी व्यक्तिश: सुनावणीस हजर राहावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे...
ऑक्टोबर 19, 2018
रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते अलीकडे बदनाम झाले. कधी त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी; तर कधी रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या जाहिरातबाजीच्या फलकांनी. गणेशोत्सवात बाप्पा खड्डे तुडवतच आले आणि ‘...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - स्थानिक पातळीवर विकासाची गंगा नेण्याचे ध्येय जोपासणाऱ्या "पंचायतराज' या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या महत्त्वाकांक्षी धोरणाला राज्य सरकारने कात्री लावली आहे. कृषी विभागानंतर आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकार पालकमंत्र्यांना बहाल करत सरकारने या लोकशाही...
ऑक्टोबर 05, 2018
उल्हासनगर - महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसऱ्या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...