एकूण 823 परिणाम
जून 07, 2019
लातूर - शहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला असला तरी काही स्वच्छतागृहे अजूनही ‘कुलूपबंद’ आहेत. तर काही स्वच्छतागृहांचे बांधकाम महिनोनमहिने रेंगाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ‘आम्ही जायचं कुठं’ हा सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे. त्याकडे महापालिका आणि...
मे 31, 2019
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात टंचाई परिस्‍थितीवर मात करण्यासोबतच गावातील प्रश्नांच्या सोडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्हॉटस्‌अॅपचा फंडा सुरु केला आहे. व्हॉटस्‌अपवर आलेल्या तक्रारींच्या नोंदी घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या ...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’...
मे 28, 2019
सोलापूर : निधीअभावी शासकीय कामे अनेक वर्षे अपूर्ण राहिल्याचे आपण पाहतो, पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नाही. असाच प्रकार सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बाबतीत झाला आहे. कारागृहातील नवीन बराकीचे बांधकाम निधीअभावी अर्धवट आहे. सध्याच्या कारागृहाची क्षमता 141 असून कैद्यांची (बंदी) संख्या...
मे 28, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील एका वसाहतीच्या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी करून ही पालिकेने लक्ष्य न दिल्याने कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोर आज मंगळवार ता 21 मे पासून स्थानिक नागरिक आणि आप आदमी पार्टीच्या पदाधिकारी वर्गाने साखळी उपोषण सुरू केले असून पालिका...
मे 28, 2019
उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : शासनाने गावे हागणदारीमुक्ती साठी विविध प्रकारच्या उपाय योजना सुरू केल्या. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने अंमलबजावणी सुध्दा केली गेली मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व त्यात शासनाच्या पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख लिटर...
मे 22, 2019
ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील एसटी...
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून पाच ते ५० हजार...
मे 19, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानके खासगी वाहनांच्या विळख्यात अडकली असताना पोलिस त्याकडे  सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत. यावरून खासगी वाहतूकदारांबाबत पोलिस एवढे मेहेरबान का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे....
मे 15, 2019
जळगाव - शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून विकासकामांचा आराखडाही तयार करण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांच्या कामांपैकी ५० कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली असून, महापालिकेने मंजुरीसाठी...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या...
मे 10, 2019
एकुर्का - एकेकाळी ‘ते’ गाव पाणंदमुक्त होऊन जगाच्या नकाशावर गेले. दहा लाख रुपये बक्षीसही मिळविले. राज्यभर गवगवा झाला; मात्र आजच्या घडीला पाणंदमुक्त झालेल्या या गावातील वृद्ध, अपंग, तरुण, चिमुकल्यांना घोटभर पाण्यासाठी दिवसभर गावाबाहेरच्या दीड किलोमीटरवर असलेल्या डोहावर जावं लागत आहे. सरकारी दप्तरातून...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 10, 2019
नवी मुंबई - शहरातील बहुसंख्य रहिवासी आणि वाणिज्य स्वरूपाच्या इमारतींवर उभारण्यात आलेल्या इमारतींवरील बेकायदा पत्र्याच्या शेड्‌सना महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. शहरातील शेकडो इमारतींना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पत्र्याच्या शेड्‌सची चटईक्षेत्रमुक्त...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 09, 2019
कल्याण : मागील बारा वर्षात कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येक वर्षी सरासरी पाच हजार अनधिकृत बांधकामे उभी राहात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 2007 मध्ये अग्यार समितीसमोर चौकशीदरम्यान आलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 67000 इतकी अनधिकृत बांधकामे होती. 31 मार्च 2019...
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला....