एकूण 551 परिणाम
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या...
जून 06, 2019
मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी सात वर्षांत मुंबईत जागा मिळालेली नाही; परंतु नवी मुंबईने आघाडी घेत मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी जागा निश्‍चित करून वास्तू उभारण्यासाठी निविदाही मागवल्या. मुंबईतील मुख्य केंद्राची जागा निश्‍चित करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या...
जून 05, 2019
सोलापूर - राज्य सरकारने 72 हजार पदांची रिक्‍त पदांची मेगा भरती काढली; परंतु प्रत्यक्षात राज्यातील पोलिस, महसूल, शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण, सहकार, आरोग्य, कृषी, बॅंक, पाणीपुरवठा यासह अन्य विभागांमध्ये सद्यस्थितीत सव्वा लाखाहून अधिक पदे रिक्‍त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सरकारी काम...
जून 04, 2019
शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाला अपयश आल्याची टीका नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी नुकतीच  केली. गेल्या चौदा वर्षांत तीन वेळा एसआरएच्या बांधकाम नियमावलीत नगर विकास...
जून 03, 2019
पुणे - मेट्रो मार्गालगतच्या टीओडी झोनमधून (ट्रान्झिट ओरिएंटेड झोन) मिळणाऱ्या प्रीमिअमच्या रकमेतून महापालिकेला आणि महामेट्रोला प्रत्येकी पन्नास टक्के वाटा देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे प्रीमिअमपोटी जमा रकमेच्या 75 टक्के महापालिकेला व उर्वरित 25 टक्के महामेट्रोला द्यावी,...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 28, 2019
मुंबई - कोकण विभागातील एसटी आगारांच्या नूतनीकरणासाठी महामंडळातर्फे सात कोटी रुपयांची 17 कंत्राटे दिली जाणार आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच 17 मे रोजी या कामांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. निविदा प्रक्रियेची ही घाई कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. राज्यात 11 मार्च ते 27...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 11, 2019
मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक...
मे 10, 2019
एकुर्का - एकेकाळी ‘ते’ गाव पाणंदमुक्त होऊन जगाच्या नकाशावर गेले. दहा लाख रुपये बक्षीसही मिळविले. राज्यभर गवगवा झाला; मात्र आजच्या घडीला पाणंदमुक्त झालेल्या या गावातील वृद्ध, अपंग, तरुण, चिमुकल्यांना घोटभर पाण्यासाठी दिवसभर गावाबाहेरच्या दीड किलोमीटरवर असलेल्या डोहावर जावं लागत आहे. सरकारी दप्तरातून...
एप्रिल 30, 2019
पुणे - सिमी संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने गठित केलेल्या बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधिकरणाचा दौरा 3 आणि 4 मे रोजी पुण्यात होणार आहे. या दोन दिवशी याप्रकरणी सुनावणी होणार असून, त्याकरिता न्यायाधीश मुक्ता गुप्ता उपस्थित राहणार आहेत.  गुप्ता यांच्यासोबत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 20, 2019
पुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.   कोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
एप्रिल 13, 2019
नाशिक - खंडणी न दिल्याबद्दल कुख्यात रवी पुजारीच्या टोळीने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गोळीबार करून प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांना मोका अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड, तर चौथ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या विशेष मोका...
एप्रिल 07, 2019
सावंतवाडी - गोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्‍शन‘ अधिक घट्ट झाले आहे. यामुळे सिंधुदुर्गमार्गे होणारी दारूतस्करी थोडी कमी झाली असली तरी अजूनही कोट्यवधींचा माल गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात पोचत आहे. गोव्यातून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रासह इतर भागांत...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांचे अनुदान हवे असेल तर नव्याने बांधलेल्या घरासमोर किमान दोन झाडे लावणे बंधनकारक असेल, अशी अट आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी (ता. चार) लाभार्थींना घातली आहे.  पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे 80 हजार जणांनी घरासाठी अर्ज केले होते....