एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 22, 2018
कॅलिफोर्नियामधील सॅनटा मोनिका ते शिकागो हा पहिला हायवे (रुट 66) सुमारे चार हजार मैलांचा व अनेक राज्यांतून जाणारा आहे. या हमरस्त्यावरचे एक शहर अल्बकर्की येथे इंग्लिशमधील अनेक गाणी चित्रित झालेली आहेत. किंगस्‌मॅन शहरात जुनी शंभर वर्षांपूर्वीची घरे, हॉटेल्स, सायकलची दुकाने, तसेच त्या काळातील...
ऑक्टोबर 02, 2018
पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले. मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने जिन्यावरून खाली यायचे...
सप्टेंबर 03, 2018
मागच्या श्रावणातली आठवण. घरासमोर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. तिथेच टपरीमध्ये वॉचमन बायको-मुलासह राहात होता. दीड वर्षांच्या गोपाळला त्याची आई रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळूच्या ढिगाऱ्यावर बसवायची आणि आजूबाजूलाच काम करीत राहायची. त्या दिवशी सकाळी मी चहा घेत गच्चीत बसले होते. खाली...
मे 18, 2018
इच्छा हवी. युद्धमय वातावरणात सीमेवर राहूनही अभ्यास करता येतो आणि पदवीपर्यंत शिक्षणही पूर्ण करता येते. अडचणींवर मात करीत शिकता येते. सायरन झाला. एअरमॅन मेसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे पत्रपेटी पाहिली. माझ्यासाठी पोस्टकार्ड मिळाले ! नजर टाकली. एकदम आनंदलो. एसएससी झाल्यावर मी हवाईदलात भरती झालो. प्रशिक्षण...
एप्रिल 02, 2018
फास्ट फॉरवर्ड जीवनशैलीमुळे असमाधान वाढते आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभे राहणारे प्रश्‍न उत्तर न शोधता डिलिट करण्यासारखे नाहीत.  माझा सहा वर्षांचा नातू आयपॅडवर ‘टॉम अँड जेरी’ बघत होता. थोडा भाग बघून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘आजी, आता याचा कंटाळा आला. आपण आता हे फास्ट फॉरवर्ड करूया.’’ मध्यंतरी आम्ही...
मार्च 17, 2018
आपल्याकडे घरकामाला येणाऱ्या मावशींची झोपडी कधीही वाऱ्यावर उडून जाईल, असे त्या बायकांना समजले. त्या एकमेकींशी दूरध्वनीवरून बोलल्या आणि त्या बायकांनी मावशीचे घर बांधले. जयाबाईंचे तसे बरे चालले होते. नवरा महापालिकेत सफाई कामगार होता. पगार, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी सारे ठीक होते. पुढे मुलालाही...
मार्च 07, 2018
ही लढाई आहे एका सामान्य माणसाची. शासकीय यंत्रणांशी भांडणे सामान्य माणसाला अशक्‍य कोटीतील असते, हा समज खोटा पाडणारी ही लढाई आहे. सर्वसामान्य माणसाकडे पैसे थकले, तर कोणतीही बॅंक वसुलीसाठी तगादा लावते. पण मी बॅंकेकडून अठरा वर्षांच्या प्रयत्नांनंतर सव्याज वसुली केली. त्याची ही गोष्ट. मी 1964 मध्ये...
जानेवारी 12, 2018
श्रमसंस्कारांची ताकद मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणारी कामेही श्रमदानातून सहज पार पडतात. डोंगर वाकवण्याची शक्ती या श्रमसंस्कारात आहे. ती ओळखायला हवी. नुकतीच पदवी परीक्षा देऊन अभ्यासातून मोकळा झालो होतो. माझे परममित्र द्वारकानाथ लेले म्हणाले, ""अरे, राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या शिबिरात दाखल...
नोव्हेंबर 07, 2017
बाल्कनीच्या जाळीवर कबुतरे क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात. ती मला आताशी गोंडस वाटत नाहीत. अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका . मी काही कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाही की कसला "संदेसा'. अन्‌ संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की, "बाबा जा, माझ्या...
ऑक्टोबर 12, 2017
नव्या शस्त्रांची चाचणी करायला काश्‍मिरात पोचलो. लष्कराच्या कॅम्पवर होतो. नदीच्या रेषेपल्याड पाकिस्तानच्या चौक्‍या. तेथील सैनिकांच्या हालचालीही इथून दिसायच्या. अधूनमधून गोळीबार चाले. ही आमच्यासाठीही एन्डुरन्स चाचणी होती म्हणा ना...! मी संरक्षण खात्यात होतो. आमच्या संस्थेने विकसित केलेल्या इन्सास...
ऑगस्ट 01, 2017
हे उद्यान पुण्यातच आहे. गजबजलेल्या रस्त्यावर. तरीही निसर्गातला एकांत सहवास मिळवून देणारे. हे उद्यान म्हणजे जणू जपानी उद्यान शैलीच्या नजाकतीचा एक नमुनाच आपल्यासमोर उलगडला आहे. पाऊस नुकताच संपला होता. आसमंतात अजून मृद्‌गंध दरवळतो आहे. वृक्ष, वेलींचा पर्णसंभार कोवळ्या उन्हात ताजातवाना खुलून दिसत आहे....
जुलै 07, 2017
कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे. शे-सव्वाशे वर्षं झाली. अगदी सांगायचे तर 1875-76 चा काळ. एका सायंकाळी एक...
डिसेंबर 07, 2016
एकदा दोन प्रसंग ओढवले. जिवावरचे. पण दोन्हीतून सुखरूप राहिलो. केवळ धाक दाखवून मृत्यू माघारी गेला होता. मला म्हण आठवत राहिली, देव तारी त्याला कोण मारी? अधिक आषाढातील ही गोष्ट. बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ पुरुषोत्तमपुरी नावाचे पवित्र ठिकाण आहे. तेथे फार पुरातन मंदिर आहे. दर अधिक महिन्यात तेथे दर्शनाचे...
डिसेंबर 03, 2016
आम्ही बाणेरला रो हाउसमध्ये राहायला आलो. आम्हाला घाई असल्याने बिल्डरने आमचे घर लवकर पूर्ण करून दिले. इतर घरांचे व आवारातील बरेच काम बाकी होते. एक मजूर कुटुंब शेजारीच एका पत्रा शेडमध्ये राहात होते. नवरा- बायको व एक वर्षाचा छोटा मुलगा. नवऱ्याचे नाव मारुती. तो बिगारी कामगार व त्याची बायको राधा, तीपण...
नोव्हेंबर 17, 2016
अमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे. यंदाच्या माझ्या डॅलस (अमेरिका) येथील मुक्कामात बेव्हर्ली लुईस या श्रेष्ठ लेखिकेच्या...
नोव्हेंबर 04, 2016
कुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. जे वस्त्रहीन आहेत, त्यांच्यासाठी वस्त्रदान करायला हवे. शहर म्हटले की उंच उंच संकुले असतात आणि त्याच्या कुंपणाबाहेर झोपडपट्टीही लांबलचक पसरलेली दिसते. दोघेही एकमेकांवर अवलंबून असले तरी, प्रत्येक गोष्टीचे पैशांत रूपांतर केले, की...
जून 21, 2016
बिया पेरण्याचं काम माझ्यासारखी अनेक माणसं करीत असतीलच. पण गावोगावी असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य जागी बिया पेरण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली, तर मोठं काम होईल. पर्यावरण बिघडल्यामुळे आपण हवामान बदलाचे चटके सातत्याने सोसत आहोत. गारपीट असो,...