एकूण 97 परिणाम
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 09, 2019
चौकाच्या कोपऱ्यात लाकडी फळ्यांचं छोटंसं दुकान होतं. समोर एक जुनाट आरसा, ऐतिहासिक वाटावी अशी उंच लाकडी खुर्ची. गिऱ्हाइकाला बसायला डुगुडुगु हलणारं बेभरवशी बाकडं. त्या बाकड्यावरून गावातलं कुणी खाली पडलं नाही असा एकही दिवस जात नसे. लाकडी फळ्यांवर देवांच्या तसबिरी. सर्व तसबिरींवर उदबत्तीचा धूर जाईल अशा...
जून 07, 2019
वीकेंड पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या काही दशकांत...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 05, 2019
कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरतात; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे.   ...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 17, 2019
नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी... आज जगातल्या...
मार्च 17, 2019
ओंकारनं पक्‍याला भेटता येईल का ते विचारलं. मजूर लोक त्याला इमारतीच्या मागं घेऊन गेले. तिथं एका तुटक्‍या खुर्चीत शून्यात नजर लावून बसलेला पक्‍या दिसला. त्याच्या मजूर मित्रांनी त्याला ओंकारची भेट करून दिली. पक्‍या आपल्या तंद्रीतून बाहेर आला; पण डोळ्यातली उदासी तशीच. ओंकारनं काही पैसे पक्‍याला देऊ...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
जानेवारी 20, 2019
गुगल ग्लास म्हणजे डोळ्यांवर घालायचा एक खास तऱ्हेचा चष्मा; पण या चष्म्यात एक कॅमेरा, एक मायक्रोफोन, स्पीकर, सेन्सर, एक पडदा, १६ जीबी मेमरी असलेला, जीपीएसची चिप, गुगल मॅप, भाषांतराचं सॉफ्टवेअर, ब्लुटूथ आणि वाय-फायची सोय असलेला एक अतिशय लहान कॉम्प्युटर अशा गोष्टी असतील. थोडक्‍यात त्या चष्म्यातच एक...
जानेवारी 20, 2019
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पक्षाची निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली. ‘२०१९ में फिर मोदी सरकार’ असा नारा पक्षानं दिला आहे. तो देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह विविध नेत्यांनी लावलेला सूर, तसेच एकापाठोपाठ एक असे सरकार घेत असलेले...
जानेवारी 20, 2019
उत्तर प्रदेशाच्या कुरुक्षेत्रावर विरोधक झपाट्यानं एकत्र येऊ लागल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे. समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी भाजपप्रमाणेच काँग्रेसच्याही चिंता वाढवणारी आहे. कारण, या नव्या आघाडीकारणात दोन्ही राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांनी सोईनं बाजूला...
जानेवारी 14, 2019
एकेकाळी लोकशाहीतील नेते सर्व घटकांशी संवाद साधत. निवडून आल्यानंतर ते लोकहिताचा विचार करीत. यामध्ये त्यांना कौल न देणाऱ्यांचाही समावेश असे. आता जो तो केवळ त्याच्या मतपेढीचा विचार करताना दिसतो. इतर त्यांच्या खिजगिणतीत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना कोट्यवधी लोक वाचाळ मूर्ख आणि वर्णद्वेषी म्हणतात. या...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...