एकूण 32 परिणाम
जुलै 06, 2019
मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली,...
जुलै 04, 2019
निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा...
जून 28, 2019
बेळगाव - आंब्याच्या बागेत जनावरे चरायला सोडल्याच्या रागातून मुत्यानट्टीत (ता. बेळगाव) तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.27) रात्री अकराच्या सुमारास घडली. सिद्राय रुद्राप्पा नाईक (वय 30, रा. मुत्यानट्टी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
जून 02, 2019
बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी...
मे 31, 2019
खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 04, 2019
बेळगाव -  तुटुन पडलेल्या भाररहित वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह बैलजोडी मृत्यूमुखी पडली. ही घटना रामदुर्ग तालुक्‍यातील के. तिम्मापुर गावात बुधवारी (ता. 3) सायंकाळी घडली आहे.  रेवप्पा कल्लोळी (वय 35) त्यांची पत्नी रत्नव्वा कल्लोळी (वय 30), मुलगा सचिन (वय 7) व...
मार्च 12, 2019
बेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते...
मार्च 03, 2019
बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...
मार्च 02, 2019
बेळगाव : पाकिस्तानची नारेबाजी करणारी पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी रामदुर्ग पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.1) रात्री 10 वाजता एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यापाठोपाठ गुन्हा दाखल झालेल्या इसमाने आपले फेसबुक हॅक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान ही घटना उघडकीस येताच...
फेब्रुवारी 17, 2019
बेळगाव - जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे. त्यानंतर...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास नवीन माडखोल, सांगेली रस्त्यावर घडली. आकाश मोहन (19) असे मृताचे नाव आहे, तर जखमी रामा नारायण नानूचे (२२ रा...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
जानेवारी 28, 2019
बेळगाव - संतीबस्तवाडचे माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या मुलाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला आहे. विश्वनाथ यल्लप्पा बिरमुत्ती (वय 23) असे त्याचे नाव आहे. सोमवारी (ता.28) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संतीबस्तवाड येथील एका इंग्रजी माध्यम हायस्कूलनजीक आज एका...
जानेवारी 06, 2019
निपाणी - पुणे-बंगळूर महामार्गावरील निपाणीजवळील स्तवनिधी (तवंदी) घाटात शनिवारी (ता. ५) ट्रक व मोटार यांच्यातील भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. ट्रकचालकाचा उपचार सुरू असताना रात्री उशिरा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने बेळगावकडे जाणाऱ्या मोटारीला दुभाजक तोडून धडक...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...