एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
कागवाड - मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार झाल्याची घटना कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण कागवाड येथील आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी...
सप्टेंबर 30, 2019
बेळगाव - लॉजवर काम करणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे. विनायक कलाल ( वय 28. मूळ रा. घटप्रभा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक हा राजपुरोहीत लॉजमध्ये गेल्या दोन...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
जुलै 21, 2019
रत्नागिरी - उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जणं बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना वाचविले. सुट्ट्यांमुळे पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिरापुढे निर्माण होणाऱ्या चाळात पोहणारे पर्यटक...
जुलै 06, 2019
मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली,...
जुलै 04, 2019
निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा...
जून 28, 2019
बेळगाव - आंब्याच्या बागेत जनावरे चरायला सोडल्याच्या रागातून मुत्यानट्टीत (ता. बेळगाव) तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.27) रात्री अकराच्या सुमारास घडली. सिद्राय रुद्राप्पा नाईक (वय 30, रा. मुत्यानट्टी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
मार्च 02, 2019
बेळगाव : पाकिस्तानची नारेबाजी करणारी पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी रामदुर्ग पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.1) रात्री 10 वाजता एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यापाठोपाठ गुन्हा दाखल झालेल्या इसमाने आपले फेसबुक हॅक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान ही घटना उघडकीस येताच...
जानेवारी 06, 2019
निपाणी - पुणे-बंगळूर महामार्गावरील निपाणीजवळील स्तवनिधी (तवंदी) घाटात शनिवारी (ता. ५) ट्रक व मोटार यांच्यातील भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. ट्रकचालकाचा उपचार सुरू असताना रात्री उशिरा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने बेळगावकडे जाणाऱ्या मोटारीला दुभाजक तोडून धडक...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक, पाशापुरा, गुलबर्गा) असे अटक...
ऑगस्ट 21, 2018
बेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच प्रकरणाचा उलगडा केला असून दोघा संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  गावातील एका शिक्षकाच्या मुलाचे सोमवारी (ता.20) अज्ञातांनी...
जुलै 08, 2018
कोल्हापूर : चंदगड-तिलारी घाटातून वॅगनार कार दरीत कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना आज (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या अपघातमध्ये कारमधील पाचही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली.   तिलारीजवळ असलेल्या घाटात कोदाळी येथील लष्कर पॉईंटवरुन पाच युवक गाडीसह दरीत कोसळले. ...
जून 24, 2018
बेळगाव - दुचाकी जळून खाक झाल्याची घटना काल (ता.23) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली. दुचाकी अचानक पेट घेतली किंवा समाजकंटकांनी आग लावली, या बाबातची चौकशी सुरु आहे. मार्केट पोलिस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली आहे.  समर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे...
जून 24, 2018
बेळगाव - दुचाकी जळून खाक झाल्याची घटना आज (ता.24) पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. दुचाकी अचानक पेट घेतली किंवा समाजकंटकांनी आग लावली, त्याची चौकशी सुरु आहे. मार्केट पोलिस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली आहे.  समर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे 2 दुचाकी...