एकूण 25 परिणाम
जुलै 04, 2019
निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा...
मे 31, 2019
खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मार्च 12, 2019
बेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते...
मार्च 03, 2019
बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास नवीन माडखोल, सांगेली रस्त्यावर घडली. आकाश मोहन (19) असे मृताचे नाव आहे, तर जखमी रामा नारायण नानूचे (२२ रा...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...
सप्टेंबर 10, 2018
बेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.  तिप्पणा...
सप्टेंबर 01, 2018
बेळगाव : बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करुन गावठी दारुसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (ता.1) मध्यरात्री एकच्या सुमारास मुचंडी (ता. बेळगाव) नजिक अबकारी पोलिसानी केली आहे. दारुची वाहतूक करणारा संशयीत...
ऑगस्ट 25, 2018
बेळगाव : शेतावर गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला.  आप्पाणा जिनाप्पा शंकरगौडा (वय 55, रा. अलारवाड) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्घटना शनिवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता अलारवाड (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली. घटनेची नोंद माळमारुती...
ऑगस्ट 06, 2018
बेळगाव - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बापट गल्लीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख 8 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवार (ता. 6) सकाळी उघडकीस आली असून घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील...
जुलै 27, 2018
बेळगाव : गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या...
जुलै 23, 2018
बेळगाव - वृद्धेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास शहापूर येथे उघडकीस आली. लक्ष्मीबाई वसंत शिरोडकर (वय 82, रा. सरस्वती रोड, भारतनगर शहापूर) असे मृत वृद्धेचे नाव आहे.  आजारपणामुळे मानसिक अस्वास्थ्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे. ...
जून 24, 2018
बेळगाव - सुटीचा दिवस असल्याने फिरायला गेलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटारीची जोरदार धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. खानापूर रोडवरील प्रभुनगरजवळ आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. तिघेही तरुण 20 वर्षाचे...
जून 24, 2018
बेळगाव - सुटीचा दिवस असल्याने फिरायला गेलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटारीची जोरदार धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. खानापूर रोडवरील प्रभु नगर जवळ आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. तिघेही तरुण 20 वर्षाचे...
जून 04, 2018
बेळगाव - बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश शरद जोशी वय (40 रा. अमृत मलम फॅक्टरी पाईपलाईन रोड, बेळगाव) यांनी आत्महत्या केल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली. दोनच्या सुमारास त्यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले....
जून 02, 2018
बेळगाव : तरुणाचा खून झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास नेहरू नगर येथे उघडकीस आली. गणेश ऊर्फ बसवराज यल्लाप्पा काकती (वय 22, रा. नेहरूनगर पहिला क्रॉस) असे मृताचे नाव आहे. बसवराजकडे असलेला कॅमेरा त्याच्या मित्राने मागितला होता. परंतु तो देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले...
एप्रिल 11, 2018
रायबाग - हळे डीगेवाडी ( ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली आहे. रावसाब बाबु चौगुले (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शेतकरी रावसाब चौगुले यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच इतरांकडून हात...
मार्च 30, 2018
बेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा...
मार्च 22, 2018
बेळगाव - चन्नम्मा सर्कल मध्ये आज अचानक ओमनी मोटारीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते. चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक...