एकूण 469 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘म्हणींवरून कथालेखन’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रौढकथा विभागात अंधेरीच्या शिल्पा शेडगे, तर बालकथा विभागात परळच्या स्नेहजीत वाघने प्रथम क्रमांक पटकावला.  मराठीतील म्हणींना मोठी परंपरा...
जून 26, 2019
सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सूर्यकांत शंकरराव दोरुगडे हे गेल्या दहा वर्षांपासून इक्रिसॅट पद्धतीने उन्हाळी भुईमुगाचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यांनी बियाणे प्रक्षेत्र, खते देण्याची पद्धत, पीक व्यवस्थापनात नावीन्य जपलेच, त्याचबरोबरीने विक्री व्यवस्थेतही कौशल्य वापरत जादा...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 21, 2019
बेळगाव - जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रायबाग तालुक्‍यातील यल्पारट्टीतील दोघी सख्ख्या बहिणींनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. दीपाली शिवानंद गोडोडगी आणि रुपाली शिवानंद गोडोडगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा कौटुंबिक जीवनापासून ते पीएसआय पदापर्यंतचा प्रवास थक्‍क...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
जून 20, 2019
बेळगाव - सौंदत्ती रेणुका देवी मंदिर परिसरात गुरुवारी देवीच्या भक्तांसमोर कुंडातून धबधबा वाहतानाचे दृष्य पाहावयास मिळाले. डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी कुंडातून बाहेर निघाल्याने ही दृश्‍य पाहायला मिळाले. दरवर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी वाहात असल्याचे देवस्थान...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
बेळगाव - बेळगाव स्मार्ट सिटी विभागाने महिला सबलीकरणासाठी नवे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून ३१ ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामधील सात ई-रिक्षा महिलांना देण्यात येणार आहेत. या माध्यमातून बेळगावातील रस्त्यांवर पहिल्यांदाच ई-रिक्षा धावणार आहेत. त्यासाठी १५...
जून 20, 2019
कोल्हापूर -  कोल्हापुरी ही कोल्हापुरी चप्पलच असली पाहिजे. कर्नाटकात तयार होणाऱ्या चप्पलला कर्नाटकी चप्पल म्हणून मंजुरी द्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात - महाराष्ट्रातच तयार झालेली असली पाहिजे. महामंडळाच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणून मंजुरी...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 18, 2019
बेळगाव - महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून चार टीएमसी कृष्णेत पाणी सोडा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी अलमट्टी जलाशयातून चार टीएमसी पाणी सोडा असा ठराव जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आला. जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक आज झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
जून 14, 2019
मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...