एकूण 49 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने आज आणखी तिघा संशयितांना अटक केली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हबीब चाळ, हुबळी, कर्नाटक) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी त्या संशयितांची नावे आहेत....
ऑगस्ट 30, 2019
दोडामार्ग - धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्‍यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे; मात्र ही गळती कालपरवाची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला, तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजारो लोकांचा जीव धोक्‍यात असताना शासन उंटावरून शेळ्या हाकत...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद - चार आठवड्यांनंतर मंगळवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा महसूल विभागाने केला. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापूरहून विमान मागविण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी विमानाने आकाशात झेपही घेतली; मात्र अपेक्षित...
ऑगस्ट 13, 2019
बेळगाव - कमी पाऊस आणि सातत्याने दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यात पुरामुळे मोठी पडझड झाली आहे.  यंदा प्रथमच नवलतीर्थ धरण भरले.यामुळे यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे रामदुर्ग आणि साैेदत्ती तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली. या पुरात घरांची मोठ्या...
ऑगस्ट 10, 2019
बेळगाव - शहरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये अद्यापही पुराचे पाणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे पाणी पुरवठा मंडळ आणि विविध संघटनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. पण टँकर गल्लीत...
ऑगस्ट 09, 2019
आंबोली -  गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील ब्रिटिशकालीन घाट कमजोर झाला आहे. ठिकठिकाणी धोकादायक बनलेल्या दरडी, रस्त्यावर येणारे पाण्याचे लोट आणि खासगी मोबाईल कंपनीसाठी खोदलेल्या चरामुळे भेगाळलेले कठडे, खचलेला रस्ता यामुळे या घाटाची अपरिमित हानी झाली. या अतिवृष्टीत आंबोली घाटात मुख्य...
ऑगस्ट 08, 2019
बेळगाव - पुरात अडकलेल्या दाम्पत्याने तब्बल 3 दिवस झाडावर आश्रय घेतल्याची धक्कादायक माहिती बेळगाव तालुक्यातील कबलापूर गावात आज (ता.8) उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता.8) दाम्पत्याला अग्निशमक दलाच्या जवानांनी मदतीचा हात देत सुखरूप बाहेर काढले. कबलापूर येथे नाल्याजवळ काडप्पा व...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
ऑगस्ट 06, 2019
निपाणी - निपाणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसासह विविध धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे यमगरणी जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर निपाणी महामार्ग ठप्प झाला आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.५)रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने आडवी आहेत....
ऑगस्ट 05, 2019
बेळगाव - मुसळधार पाऊस आणि पुलांवर आलेल्या पाण्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगाव  व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील (रामदुर्ग तालुका वगळता) सर्व शाळांना मंगळवार (ता. 6) व  बुधवारी (ता. 7) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान...
ऑगस्ट 02, 2019
बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब...
जून 28, 2019
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.  आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
ऑक्टोबर 14, 2018
शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...