एकूण 44 परिणाम
जून 03, 2019
बेळगाव - भुतरामहट्टी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना यापुढे जंगलचा राजा ‘सिंहा’चे दर्शन घडणार आहे. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्यामुळे भुतरामट्टीत वाघ आणि अस्वलाबरोबरच सिंहही दिसणार आहेत.  सिंह म्हैसूर प्राणीसंग्रहालयातच...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
मे 31, 2019
खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...
मे 27, 2019
बेळगाव : देसुरजवळ महामार्गाचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून तीन कामगारांचा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव ते अनमोडपर्यंतच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगावपासुन 15 किमीजवळील देसुरजवळ...
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (...
मे 04, 2019
बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात रस्ता करण्याचे काम बंद करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, जेसीबी व इतर मशिनरी लावून उभ्या पिकातून रस्ता...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
जानेवारी 06, 2019
निपाणी - पुणे-बंगळूर महामार्गावरील निपाणीजवळील स्तवनिधी (तवंदी) घाटात शनिवारी (ता. ५) ट्रक व मोटार यांच्यातील भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. ट्रकचालकाचा उपचार सुरू असताना रात्री उशिरा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने बेळगावकडे जाणाऱ्या मोटारीला दुभाजक तोडून धडक...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक...
ऑक्टोबर 05, 2018
पेठवडगाव - पुणे -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा कंडेक्टर ठार तर २९ प्रवाशी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडली. या अपघातामध्ये सागर एस परब (वय.30, रा.कालेली, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) हे ठार झाले आहेत तर चालक महंमद...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...
ऑगस्ट 18, 2018
इस्लामपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा (ता.वाळवा) येथे धोकादायकरित्या लावलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत आयशरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. शहाहुसेन शब्बीर शेख (वय 26, रा. अंकलीखुर, चिकोडी) व सोहेल दस्तगीर मुरगुडे (वय 24...
ऑगस्ट 18, 2018
बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्ण विधानसौध नजीकच्या एससी मोटर्स समोर शनिवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता घडला.  पुणेहून बंगळूरकडे जाणाऱ्या व्हीआरलच्या आराम बसवरील...
ऑगस्ट 12, 2018
कोल्हापूर - कागल-सातारा या सहापदरी महामार्गाचे काम कोणी करायचे, या वादात अडकले आहे. नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात हा वाद सुरू आहे. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या कामामुळे निर्माण झालेला वाद मिटल्याशिवाय या कामाची फाईलच पुढे सरकणार नाही. कामासाठी...
ऑगस्ट 08, 2018
बेळगाव - गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक आज पुन्हा बेळगावात दाखल झाले. महाद्वार रोडवरील एका तरुणाने मारेकऱ्यांना जेवण व आसरा दिल्याचे तपासात समोर आल्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर तरुण स्वतःहून पथकाला शरण आला. महामार्गावर ढाबा चालवत असून, तो एका...
जुलै 15, 2018
बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस उलटून दोघेजण जागीच ठार, तर 18 जण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठजवळ घडली. आज पहाटे 6.20 वाजता घडलेल्या या अपघातात प्रवासी म्हणून जाणारा वायव्य परिवहन मंडळाचा बसचालक अशोक बसाप्पा दुंडी (वय 39, रा. निच्चनकी, ता....
जुलै 14, 2018
बेळगाव : बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस उलटीन दोघे जण जागीच ठार झाले तर 16 जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर जखमी आहेत. आज ( ता. 14) पहाटे 6.30 च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ नजीक घडला. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अशोक दुडी (रा. कित्तुर)...
जून 30, 2018
निपाणी - कोचीनहून मुंबईकडे प्रोपोलीन गॅस घेऊन जाणाऱ्या टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटून तो महामार्गावर उलटला. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्यापासून खबरदारी घेत पोलिस, अग्निशामक दल आणि पुंजलॉईडच्या भरारी पथकाने महामार्गावरील वाहतूक बंद केली. तब्बल चार तास महामार्ग ठप्प...
जून 27, 2018
फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा...