एकूण 76 परिणाम
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती...
मे 03, 2019
बेळगाव/बंगळूर - राज्यातील युती सरकारला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकला आहे. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना, २५ मेनंतर राज्यात राजकीय ध्रुवीकरण होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांचे बंधू व बेळगावचे पालकमंत्री सतीश...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 15, 2019
बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव...
मार्च 12, 2019
बंगळूर - लोकसभेसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेस व धजदने युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी मतदारसंघ वाटपात दोन्ही पक्षांत अद्याप एकमत झालेले नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत...
मार्च 06, 2019
बेळगाव - सर्वांना देशाची चिंता लागली आहे. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे, असा टोमणा नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी लगावला. स्मार्ट सिटी योजनेखाली टिळकवाडी, नाथ पै सर्कलमध्ये सोमवारी (ता. ४) आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे...
जानेवारी 17, 2019
निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66 वर्षापासून सनदशीरमार्गाने लढा देत आहेत. तरीही कर्नाटक शासन त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करत आहे. तो दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी...
ऑक्टोबर 03, 2018
बेळगाव - सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाला लवकरच चालना देण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीष साळवे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सोमवारी नगर...
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा व बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘तुम्हाला ३० कोटींचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर कोणी दिली?’ असा प्रश्न करून त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान...
सप्टेंबर 25, 2018
बेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या एकाधिकारशाहीला पक्षातीलच कांही नेते कंटाळले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यास त्यांना अपयश आल्यास पक्षातील...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...
सप्टेंबर 13, 2018
बंगळूर - राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा अहवाल आता दिल्लीला पोचला आहे. हायकमांडने जारकीहोळी बंधूंशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दोन अटी मान्य केल्या असून दोन अटी पूर्ण करण्यास वेळ मागितला असल्याचे समजते. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे...
ऑगस्ट 07, 2018
ओगलेवाडी - कोकण रेल्वेच्या कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने व या लोहमार्गाचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्ग होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या...
ऑगस्ट 05, 2018
बेळगाव - अंध खेळाडूंना सहानूभुती नको तर सरकारने रोजगार द्यावा, अशी अपेक्षा भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक यांनी व्यक्त केली. जितो संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नाईक म्हणाले, ‘‘अंध-अपंग खेळाडूंच्या जीवनात भक्कम...
ऑगस्ट 01, 2018
बंगळूरू - बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी कार्यालये बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मांडला आहे. कानडी-मराठी वाद बेळगावला नवीन नाही. त्यामुळेच, बेळगावचे बेळगावी असं नामकरण करण्यात आले होते. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी...