एकूण 58 परिणाम
जून 21, 2019
बेळगाव - जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रायबाग तालुक्‍यातील यल्पारट्टीतील दोघी सख्ख्या बहिणींनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. दीपाली शिवानंद गोडोडगी आणि रुपाली शिवानंद गोडोडगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा कौटुंबिक जीवनापासून ते पीएसआय पदापर्यंतचा प्रवास थक्‍क...
जून 20, 2019
बेळगाव - बेळगाव स्मार्ट सिटी विभागाने महिला सबलीकरणासाठी नवे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून ३१ ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामधील सात ई-रिक्षा महिलांना देण्यात येणार आहेत. या माध्यमातून बेळगावातील रस्त्यांवर पहिल्यांदाच ई-रिक्षा धावणार आहेत. त्यासाठी १५...
मे 19, 2019
बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी...
एप्रिल 30, 2019
बेळगाव - शिक्षण खात्याने मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल 73.7 टक्के लागला आहे. यावेळी निकालात बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली आहे.  गेल्यावेळी बेळगाव जिल्हा राज्यात 6 व्या क्रमांकावर होता मात्र यावेळी निकालात मोठी...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 17, 2019
बेळगाव - घरातील मुलाने शिकावे, खेळावे, बागडावे, मित्रांबरोबर मौजमजाही करावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, हसतखेळत शाळेत जात असतानाच शारीरिक अपंगत्व आल्याने शाळा सोडावी लागलेल्या एका जिद्दी विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. पीयूष आढाव असे...
एप्रिल 15, 2019
बेळगाव - बारावीच्या निकालात पुन्हा एकदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली असून सोमवारी पदवीपुर्व शिक्षण खात्याने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा 28 क्रमांकावर घसरला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 56.28 टक्के विध्यार्थी पास झाले...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा...
मार्च 06, 2019
बेळगाव - शंभर वर्षे पूर्ण झालेल्या काही शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शताब्दी पूर्ण झालेल्या शाळांना मदतीचा हात देण्यास सरकार पुढे सरसावले असून, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील १०० शाळांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात...
फेब्रुवारी 27, 2019
बेळगाव -  मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. परंतु, शिक्षकांनीच प्रयत्न केल्यास मराठी शाळांमध्येही पटसंख्या वाढू शकते, हे कॅंटोन्मेंट मराठी शाळेने दाखवून दिले आहे. विविध उपक्रम आणि दर्जात्मक शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - सीमा भागातील अनेक शाळांना मोठा इतिहास आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1918 साली चव्हाट गल्लीत सुरू झालेल्या मराठी शाळेचा शतक महोत्सव रविवारी (ता.18 ) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शताब्दी महोत्सव समिती व माजी विध्यार्थी यांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली जात आहे. शताब्दी...
फेब्रुवारी 20, 2019
संकेश्‍वर- माजी विधानपरिषद सदस्य सहकार महर्षी बसगौडा अप्पयगौडा पाटील (वय 102) यांचे बुधवारी (ता. 20) निधन झाले. ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमीनभावी (ता. हुक्केरी) येथे गुरूवारी (ता. 20) दुपारी वाजता वाजता त्यांच्या...
नोव्हेंबर 14, 2018
पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
ऑक्टोबर 12, 2018
सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी...
ऑक्टोबर 11, 2018
काही परंपरा थेट मानवी जीवनावर परिणाम करतात. परंपरेत जखडल्याने गावकऱ्यांची जगरहाटी बदलून जाते. श्रद्धेच्या पगड्याने म्हणा किंवा आलेल्या अनुभवांमुळे म्हणा, परंपरेच्या पालनाचा कसोशीने प्रयत्न सुरू राहतो. कालांतराने ती गावची ओळख बनून जाते; वैशिष्ट्य ठरते. सांगली जिल्ह्यातील खटाव असेच जगावेगळे गाव. या...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली...  राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे...
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी...