एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
प्रवास सुरू होता वर्धा ते कोल्हापूर दरम्यान...  रेल्वे वर्ध्याच्या काहीशी पुढे आली होती...  अचानक एक छोटीशी मुलगी समोर आली आणि आपली आई वाजवत असलेल्या वाद्यावर ताल धरुन गोड नृत्य करु लागली...  कदाचित सकाळी तिने अंघोळ केली नसावी, केस विस्कटलेले होते, चेहरा पारुसाच वाटत होता पण, तिचं हसू खुप गोड होतं...
जून 25, 2018
बाई, तिकडे थंडी किती असेल? बाई, शाळेचा गणवेश घ्यायचा ना? किती दिवस घालायचा? बाई, आम्ही मोबाईल घेतला तर चालेल ना? म्हणजे आम्हाला फोटो काढता येतील. हॅन्डबॅगेत काय काय ठेवायचे? पुण्याहून किती वाजता निघायचे? त्या दिवशीचा डबा आणायचा का? असे अनेक प्रश्‍न विचारून आम्ही मुलीनी बाईंना भंडावून सोडले. आणि तो...
मे 23, 2018
परदेशात विशेषतः अमेरिकेतील प्रशासकीय तत्परतेबाबत आपण नेहमी ऐकत असतो. परंतु मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कारण कोणतेही असतो, या ठिकाणी विलक्षण वेगाने सेवा दिली जाते. कॅलिफोर्नियामधील सॅनहोजे येथे काही महिन्यांपूर्वी असताना एकदा रात्री आठच्या दरम्यान मीना (पत्नी) कोपरगाव येथे तेथील लॅंडलाइनवरून...
फेब्रुवारी 03, 2018
भिशीची पंचविशी श्रीलंकेतील सहलीने साजरी केली. घर-संसारापासून काही दिवस दूर राहत मैत्रिणींबरोबर "तरुणपण' अनुभवले. मग पुन्हा आहेच आपापले "स्वीट होम'. "ए, आपण नुसतीच भिशी करतो, गप्पा मारतो, ते पैसेही तसेच खर्च होत आहेत, त्यापेक्षा आपण कुठेतरी भारताबाहेर जायचे का सहलीला?' एक मैत्रीण. "ए खरेच जाऊया ना...
मे 29, 2017
संपूर्ण प्रवासात तो तरुण आमच्याशी बोलला नाही की हसला नाही. सहप्रवास असा नव्हताच जणू. पण त्यानंच आम्हाला एका संकटातून वाचवलं. मी व माझी पत्नी रेखा अमेरिकेत सॅंडिएगो शहरात वास्तव्यासाठी गेलो होतो. मुलीकडे. सॅंडिएगो एक अतिशय देखणं शहर आहे. एका बाजूला समुद्रकिनारा, तर दुसऱ्या बाजूला डोंगर-दऱ्यांचा...
मे 20, 2017
कॅल्गरीला चोऱ्या अशा होत नाहीतच, तरीही आमचे मनगटी घड्याळ गडप झाले. कसे? कुठे? कळलेच नाही. हरवलेल्या वस्तूही परत मिळतात या शहरात, तेथे आमचे घड्याळ गराज सेलमध्ये विक्रीला ठेवले गेले होते. दोन- चार वर्षांपूर्वीची घटना आहे. कॅनडाच्या उत्तरेत पश्‍चिमेच्या बाजूला असलेल्या कॅल्गरी या एका छोट्या पण रमणीय...
जानेवारी 07, 2017
तो केवळ भटक्‍या होता. बॅंकेतील नोकरी सोडून तो जग पाहायला निघाला. सायकलवरून सर्व खंडांमधून त्याने भ्रमंती केली. आता पुन्हा नव्या देशांच्या दिशेने तो निघाला आहे. सारे जग भटकून पाहावे, अशी इच्छा प्रशांत गोळवळकर याला कधी झाली, तो क्षण त्यालाही सांगता येणार नाही; पण नवनव्या देशात भटकण्याची त्याची इच्छा...
जानेवारी 06, 2017
प्रवासात भाषेची धमाल अनुभवायला मिळते. कोण कुठची अक्षरं खातील, पत्ता नाही. मग त्या गाळीव अक्षरांच्या शब्दांची मूळ रूपे शोधण्यात तुमच्या भाषाज्ञानाची, संवाद कौशल्याची मिजास उतरते. ‘द्योती फी चाजिंग डेक्‌ इज देअ’ अबूधाबीच्या विमानतळावर मी जेव्हा चौकशी केली, की मोबाईल चार्जिंग फॅसिलिटी आहे का, कुठे आहे...
डिसेंबर 29, 2016
अमेरिका अनेक अंगांनी खुणावत असते. तेथील मंदिरांतील पावित्र्य आणि वाचनालयातील पुस्तकसंग्रह बोलावत असतो. तेथील शिक्षणही विचारांना चालना देणारे आहे.  अमेरिकेतला आमचा चार महिन्यांचा मुक्काम अगदी आनंदात गेला. आमच्या घरापासून एक मैलाच्या अंतरावर बालाजी मंदिर होते. तेथे रामनवमीनिमित्त वाल्मीकी रामायणाचे...