एकूण 866 परिणाम
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  जामीन मिळावा यासाठी मोदीने याअगोदर तीन वेळा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जामीन...
जून 10, 2019
नवी दिल्ली : महत्त्वाचे लष्करी तंत्रज्ञान आणि गोपनीय माहिती भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देत संयुक्त प्रकल्प राबविण्याबाबतच्या आराखड्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेतील कंपन्यांकडून भारतातील खासगी कंपन्यांना संरक्षणविषयक गोपनीय...
जून 09, 2019
लंडन : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये वास्तव्यास असलेला उद्योगपती विजय मल्ल्या आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ओव्हलवर पोहचला. मल्ल्या आणि क्रिकेटप्रेम हे सर्वांना परिचीत आहे. क्रिकेटवरील प्रेमाखातर मल्ल्या आज प्रतिष्ठेची लढाई होत असलेल्या ...
जून 09, 2019
कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले. श्रीलंकेत ईस्टर सणाच्या दिवशी मोठा बॉम्बस्फोट...
जून 09, 2019
मालदीव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना त्यांनी क्रिकेट बॅट भेट दिली. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी...
जून 08, 2019
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर...
जून 07, 2019
दुबई : संयुक्त अरब अमितरातीमध्ये (यूएई) दुबई येथे झालेल्या भीषण बस अपघातामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बारा भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज (शुक्रवार) दिली. ओमानहून दुबईला येणारी बस रस्त्याच्याकडेला असलेल्या साईनबोर्डला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे...
जून 06, 2019
दुबई : भारत-पाकिस्तान म्हटले की सर्वांत प्रथम कट्टर शत्रू म्हणून दोन्ही देश डोळ्यासमोर उभे राहतात. परंतु, यापलीकडे असते ती माणूसकी. भारतीय 'कर्णा'ने पाकिस्तानमध्ये दानशूरपणा केला आहे. या 'कर्णा'च्या ऋणात पाकिस्तानी नागरिक राहणे पसंत करत आहेत. जोगिंदरसिंह सलारिया यांचे दुबईमध्ये...
जून 03, 2019
इस्लामाबाद : येथील एका हॉटेलमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस आलेल्या अन्य देशांचे बडे अधिकारी आणि पाहुण्यांचा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी जाणीवपूर्वक अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.  सुरक्षेचे...
जून 02, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या इफ्तार पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी आलेल्या शेकडो पाहुण्यांना पाकिस्तानी...
जून 02, 2019
वॉशिंग्टन : भारताला देण्यात आलेला व्यापारविषयक प्राधान्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. भारतीय बाजारपेठेत अमेरिकेला न्याय्य आणि वाजवी प्रवेश देण्याची खात्री न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी 5...
जून 02, 2019
बीजिंग : भारताच्या परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल एस. जयशंकर यांचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अभिनंदन केले असून, दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी जयशंकर यांच्याबरोबर काम करण्यात आपण उत्सुक आहोत, असे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या...
जून 01, 2019
न्यूयॉर्क : दोन दिवसांपूर्वीच पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा जीएसपी (जनरेलाईज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्स) अंतर्गत मिळणारा व्यापारासाठीचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प...
जून 01, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रतिष्ठित 2019 स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाचे सात विद्यार्थी विजयी ठरले आहेत. 50 हजार डॉलर रोख बक्षीस असलेल्या या स्पर्धेतील हा विक्रम आहे. 550 विद्यार्थ्यांना मागे टाकून या सात विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा जिंकली. विजेत्यांमध्ये एक अमेरिकन विद्यार्थीही...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम...
मे 25, 2019
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान व्यक्ती, लोकनेते आहेत. सर्व भारतीय...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
मे 23, 2019
नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. त्यामुळेच इतर देशांच्या अध्यक्षांनी त्यांना या...