एकूण 140 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
सहलीला सगळेच जातात, पण मैत्रिणींबरोबर दक्षिण भारतात हुंदडायला जाण्यात वेगळीच धमाल होती. लहान असताना आई-बाबांबरोबर दक्षिण भारतात सहलीला गेले होते. पण या वेळेस वेगळीच मजा होती, ती म्हणजे मैत्रिणींबरोबर धमाल करायची. आम्ही चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचलो, तेव्हा बरेच कोळी एकत्र येऊन जाळे वर खेचत होते...
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य जपले आहे. त्याआधी मी...
ऑक्टोबर 12, 2019
मराठी साहित्य जगतात अभिमान वाटावी अशी घटना काल बुधवार दिनांक 9/10/2019 रोजी आखाती वाळवंटात घडली. कोकणीतील नामवंत लेखिका रुपाली कीर्तनी यांनी लिहिलेल्या "सौदीतले दिवस" या मराठी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संयुक्त अरब अमिराती ची राजधानी अबुधाबी येथे पार पडला. एखाद्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन...
ऑक्टोबर 12, 2019
एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर भारताबाहेर परदेशात नोकरी - व्यवसायानिमित्त गेली, तिकडे स्थायिक झाली की, तिला देशाविषयी आस्था नाही, तिने देशाशी प्रतारणा केली अशी एक खुळचट आणि दांभिक भावना लोकांमध्ये निर्माण होतांना दिसते. केवळ राहण्याचा पत्ता हा त्या व्यक्तीच्या देशाविषयीच्या आस्थेचा निकष होतो. १८८६...
ऑक्टोबर 05, 2019
ठरलेल्या दिवशी मी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. पण, मला उतरवून घ्यायला नवरा आलाच नाही. आज त्या घटनेला बरोबर पन्नास वर्षे झाली आहेत. पाच ऑक्टोबर १९६९ हा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. लग्न झाल्यानंतर माझा नवरा संख्याशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण...
ऑगस्ट 29, 2019
पाल्याला अमूकच शाळेत प्रवेश हवा, असा अट्टहास धरताना आपण त्या लहानशा मुलाचा विचारच करीत नाही. आपल्याला हव्या त्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी वशिला शोधतो. अचानक सकाळी सात वाजता तिचे दूरचे काका-काकू आले होते. त्यांच्या नातवाच्या शाळाप्रवेशासाठी ते आले होते. खात्यातील ओळखीच्या लोकांना सांगून प्रवेश...
ऑगस्ट 17, 2019
दिव्यांग क्रिकेटला मान्यता मिळावी यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, त्यांना भारताने मिळवलेला विश्वकरंडक पाहायला मिळायला हवा होता. इंग्लंडमध्ये नुकत्याच संपलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट विश्वकरंडकमध्ये भारताचा संघ विजेता ठरला आणि त्याक्षणी मला अजित वाडेकर सरांची तीव्र आठवण आली. बीसीसीआयच्या झेंड्याखाली...
जुलै 12, 2019
निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता 'उपासना' या भद्र दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव व हिरवाईत हरी पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. व याच उपासनेच्या मंगल भावनेतून वृक्ष लावून त्यांचे पुजारी म्हणून दादांच्या वृक्षमंदिरांत संवर्धन केले जाते....
जून 21, 2019
"घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे,' असे विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे. देण्यातच खरा आनंद असतो. माझी नात नूपुर सध्या अटलांटाला असते. ती शाळेत शिकत असताना काही दिवस आमच्याकडे येत असे. ती पाचवी-सहावीत असेल, त्या वेळचा एक प्रसंग माझ्या नेहमीच लक्षात राहिला. माझा मित्र शेख दुबईत असतो. त्याचे...
जून 10, 2019
कोणार्कचे सूर्यमंदिर पाहिले आणि मनात आले निसर्गाचे कालचक्र असेच आहे. दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस हे चक्र असेच चालू आहे. ऋतू आपले कार्य करतच आहे. बालपण, तारुण्य व म्हातारपण हे नैसर्गिकरीत्या येतच राहणार. शालेय जीवनात शिकलेले गणितातील काळ, काम, वेग हे चक्रसुद्धा आपण सोडवत असतो. वर्तमानकाळ,...
मार्च 28, 2019
भाषा ही एक मनुष्य जातीला लाभलेली देणगी आहे. पण ती आज एक भाषा उरलेली नसून प्रगती होण्यासाठीचा अट्टहास बनलेली आहे. मैत्रिणीबरोबर एका वेस्टर्न हॉटेलमध्ये गेले होते. आमचं मराठीत संभाषण चाललं होतं. थोड्या वेळाने वेटरला बोलावले आणि ती सांगायला लागली, "आय वॉंट... ऍण्ड इन द ऍण्ड वी वूड लाइक टु हॅव...! ती...
मार्च 06, 2019
मध्यरात्रीनंतर अनोळखी शहरात उतरलो होतो. मनात भीतीची भिंत उभी. पण त्या भिंतीपार जायचा विश्‍वासही मिळाला. काही घटना माणूस आयुष्यभर विसरत नाही. त्या कायमच्या मनामध्ये राहतात. बरीच वर्षे झाली. मी आणि माझे पती आमच्या लग्नानंतर बंगलोरला फिरावयास गेलो होतो. तिथून आम्ही तीन दिवसांसाठी जवळच्या स्थळांना भेट...
फेब्रुवारी 21, 2019
हॉलंडला टुलिपचा कंद मिळाला नाही. लंडनला बागेत टाकलेला कंद टुलिपचा असावा म्हणून उचलला, पण तो कर्दळीचा निघाला. पूजा करताना केवळ लाल रंगाची म्हणून कर्दळीची फुले गणपतीच्या मुकुटावर खोचते. पूजा झाल्यावर गणपतीचं स्तोत्र म्हणत असताना मला सारखे जाणवते, की गणपतीच्या मस्तकावर विराजमान झालेले कर्दळीचे फूल मला...
फेब्रुवारी 18, 2019
मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील, आल्या-गेल्या...
फेब्रुवारी 12, 2019
प्रवासाला निघाल्यावर हाताशी आपली औषधे ठेवण्यास विसरता कामा नये, असा कानाला खडा लावला. नाताळच्या सुटीत आम्ही "सिंगापूर-मलेशिया' सहलीला जायचे ठरविले. मुलाने सर्वच ऑनलाइन बुकिंग केले. विमानप्रवास, निवास, खाणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, असा सर्वच बेत ठरवून प्रवासाची तयारी केली. यादी करून सर्वच सामान भरले...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
डिसेंबर 20, 2018
वाडासंस्कृती हे पुण्याचे वैशिष्ट्य होते. वाडे गेले, पण सोसायट्यांमधून वाडासंस्कृतीच आधुनिक रुपात नांदत आहे. वाडे संपत चालले आहेत, पण वाडासंस्कृतीचा लोप होत आहे, हे खरे नाही. आधुनिकता, विभक्त कुटुंब पद्धत, व्यक्तिस्वातंत्र्य, मुलांचे परदेशी वास्तव्य इत्यादी कारणांमुळे वाडे जाऊन तिथे गगनाला भिडणाऱ्या...
ऑक्टोबर 27, 2018
समाजासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्तेही नेत्रदान का बरे करीत नाहीत, हे कोडे पडले आहे. सेवानिवृत्तीनंतर मी नेत्रदानाचा प्रचार सुरू केला. मंगेशकर रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. समीर दातार यांना भेटले, तेव्हा त्यांनी मला लगेचच नेत्रदानाची माहितीपत्रके, अर्ज दिले. मी उत्साहाने कामाला लागले. ज्येष्ठ नागरिक...
ऑक्टोबर 15, 2018
एकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, "महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या मोठ्या ग्रंथराजावरून हात फिरवताना आजोबांचे डोळे पाणावले. म्हणाले, ""गेली सात वर्षे याचसाठी पैसे जमवत होतो.'' लक्षावधी शब्दांचा संग्रह असलेला तो ग्रंथराज...
सप्टेंबर 22, 2018
तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट नेपाळमधे जायचे ठरवले. त्या काळी आजच्यासारखे गुगल नव्हते. त्यामुळे रस्ते आणि उतरायची ठिकाणे याची माहिती सहज उपलब्ध नव्हती. आम्हाला वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स...