एकूण 15 परिणाम
October 29, 2020
नागपूर  : गेल्या पाच महिन्यांत १ कोटी ६७ लाख लिटर दारू पिणाऱ्यांनी रिचविली. यातून १८० कोटींचा महसूल शासनाला मिळाला. दारुड्यांच्या प्रतिसादामुळे पाच महिन्यांतच गती पकडली. मंदी, रोजगार असो वा नसो या व्यवसायावर कोणताही परिणाम होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मार्च महिन्यात...
October 29, 2020
रिसोड (जि.वाशीम) :  दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती.. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. ना मोर्चे, ना आंदोलने...
October 29, 2020
अकोला  ः जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात घसरला असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात दोन हजारांवर कोरोनाबाधित आढळल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या २८ दिवसांत मात्र सहाशेच नवे रुग्ण आढळले आहेत. याव्यतिरीक्त गत महिन्यात ६०वर रुग्णांचा...
October 28, 2020
चतारी (जि.अकोला) ः परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे तूर पीक धोक्‍यात आले आहे. सध्या पातूर तालुक्यातील खेट्री, पिंपळखुटा, शिरपूर, चतारी, चांगेफळ, चान्नी, उमरा, पांगरा, मळसुर, सावरगाव, आडगाव, राहेर, या परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीचे...
October 28, 2020
नागपूर ः आठ महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यावर कोसळले. त्या दिवसांपासून मेडिकल असो की, मेयो येथे कोरोना वगळता इतर आजारांच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दृश्य आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. नुकतेच उपचाराच्या आशेने विदर्भासह इतर राज्यातून कोरोनाच्या संकट काळातही...
October 28, 2020
नागपूर : प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिकपणाचा अनुभव सर्वांनाच आहे. म्हणून अनेकांच्या घरी श्वान आपल्याला पाहायला मिळतो. मनुष्यही श्वानाची चांगली देखरेख करतो. परंतु, श्वानांशी संबंधित बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ श्वानांची शेपूट का...
October 28, 2020
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपट्टीच्या वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. मात्र, ग्रामपंचायत वसुलीबाबत उदासीन आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत पाणीपट्टीची थकबाकी आठ ते दहा कोटींच्या घरात पोहोचली आहे. पाणीपुरवठा कपात करणे,...
October 27, 2020
अकोला : चारही कृषी विद्यापीठातून हजारो विद्यार्थी कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ते पुढे काय करतात, कोणत्या क्षेत्रात काम करतात, कृषी क्षेत्रातच कार्यरत आहेत की अन्य क्षेत्रात? याचा आढावा कृषी विद्यापीठांनी घ्यावा. यातून आपण विद्यार्थ्यांना खरच उपयुक्त शिक्षण देतो का, हे समजून येईल. काही सुधारणा...
October 27, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.३ अशी नोंद झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ट्विटद्वारे दिलेल्या...
October 16, 2020
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अरबी समुद्राकडे जसजसे सरकत गेले तसे रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवान वार्‍यासह पावसाचा जोर गुरुवारी (ता. 15) सायंकाळी ओसरला. राजापूरची अर्जुना तर रत्नागिरीत काजळी नदीला पूर आला होता. अस्मानी संकटाचा सर्वाधिक तडाखा शेतीला बसला असून टक्के भातशेती हातची...
October 15, 2020
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यातील गावांना बुधवारी (ता. 14) रात्री जाणवलेला तो हादरा भूकंपाचा होता. त्याचा केंद्रबिंदू हा सातारा कोयना धरण परिसरातील असुन तसा अहवाल जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले; मात्र कोयनेतील भूकंपाची तीव्रता ही 2.9...
October 15, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरासह ओटवणे, चराठा, कारिवडे, माडखोल भागाला आज रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक  सौम्य धक्का जाणवला. हा प्रकार भूकंपाचा होता की अन्य कशामुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. सह्याद्रीच्या काही भागातही असा प्रकार घडला.  याबाबत अनेकांनी दुजोरा दिला; मात्र तिलारी पाटबंधारे...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट...
September 30, 2020
किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील...
September 26, 2020
उदगीर (जि.लातूर) : सतत पडणाऱ्या पावसाने मूग, तुर व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. उदगीर...