एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
जकार्ता (इंडोनेशिया) : इंडोनेशियातील दुर्गम मलुकु बेटांना स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यात 20 जण मृत्युमुखी पडले, तर 100 जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.5 होती. भूकंपामुळे घरे जमीनदोस्त झाली, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या....
सप्टेंबर 24, 2019
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्‍मीरला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसून, त्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. रिश्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती, तर केंद्रबिंदू पंजाब प्रांतातील झेलम या शहरात होता, असे पाकिस्तानच्या वेधशाळेने म्हटले आहे.  या भूकंपाचे हादरे...
ऑगस्ट 27, 2019
जाकार्ता - जाकार्ता या महानगरात झालेल्या गर्दीमुळे इंडोनेशियाची राजधानी येथून दुसरीकडे हलविण्यावर विचार सुरू असल्याचे तेथील सरकारने म्हटले आहे. इंडोनेशियाची नवी राजधानी पूर्वेकडे असलेल्या बोर्नियो बेटांवर असेल, अशी घोषणा अध्यक्ष जोको विडोडो यांनी आज केली.  आग्नेय आशियाई द्वीपसमूहाच्या केंद्र...
जुलै 06, 2019
कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात आज (शनिवार) मोठा भूकंप झाला. हा भूकंप 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद झाली आहे. 20 वर्षांतील सर्वांत मोठ्या तीव्रतेचा भूकंप आज झाला.  कॅलिफोर्नियातील रिजरक्रेस्ट या शहराजवळ जमिनीपासून 900 मीटर खोलीवर...
जून 18, 2019
बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
डिसेंबर 06, 2018
नौमेआ : प्रशांत महासागरातील न्यू कॅलेडोनियाला बुधवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर मोठ्या सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तसेच, किनारी भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र...
ऑक्टोबर 12, 2018
सिडनी (पीटीआय) : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावरील विनाशकारी भूकंप ताजा असताना आज पापुआ न्यू गिनीच्या न्यू ब्रिटेन बेटावर आणि इंडोनेशियाच्या बाली बेटावर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पापुआतील भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्‍टर स्केल इतकी होती. यापूर्वी 5.7 आणि 5.9 रिश्‍टर स्केलच्या तीव्रतेचे...
ऑक्टोबर 09, 2018
पालू (पीटीआय): इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीग्रस्त पालू शहरात ठिकठिकाणी मदतकार्य सुरू असून आतापर्यंत दोन हजार मृतदेह सापडले आहेत. तसेच पाच हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.  सुलावेसी बेटावरील दुहेरी आपत्तीमुळे मृतांची संख्या 1 हजार 944 झाली आहे. ढासळलेल्या...
ऑक्टोबर 04, 2018
वाणी (इंडोनेशिया (पीटीआय) : इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1400 वर पोचली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो न्यूग्रोहो म्हणाले, की बुधवारपर्यंत मृतांची संख्या 1407 झाली असून, त्यात पालू शहर परिसरातील संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत...
ऑक्टोबर 03, 2018
इंडोनेशिया : इंडोनेशियाला शुक्रवारी बसलेला भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार 234 वर पोचली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. इंडोनेशियातील सुम्बा बेटला आज 5.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून स्पष्ट...
ऑक्टोबर 02, 2018
पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे...
सप्टेंबर 30, 2018
इंडोनेशिया- इंडोनेशियातील भूकंपाची परिस्थिती भीषण असून, मृतांचा आकडा 830 वर पोहोचला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला 7.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे या भागातील 830 जणांचा मृत्यू झाला...
सप्टेंबर 29, 2018
इंडोनेशिया- इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर काल (ता. 28) भूकंपाचा तडाखा बसला. समुद्रात झालेल्या शक्तिशाली भुकंपानंतर इंडोनेशियाच्या पालू शहराला भयानक अशा सुनामी लाटांचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जखमी अवस्थेत विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, येथील एका रुग्णालयात आज (ता....
ऑगस्ट 06, 2018
जकार्ता : इंडोनेशियाच्या लॉमबॉक बेटांना रविवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 82 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जखमी आहेत.  अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7 रिश्‍टर स्केल अशी नोंदली गेली असून, याचे केंद्र जमिनीच्या दहा किलोमीटर आत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये...
जुलै 30, 2018
जाकार्ता : इंडोनेशियातील शक्तिशाली भूकंपामुळे चौदा जण ठार, तर 160 हून अधिक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे हजारांवरून अधिक घरांची पडझड झाली आहे. बाली बेटापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ लोम्बोक येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता भूकंप...
जून 19, 2018
टोकिओ : जपानच्या पश्‍चिम भागात असलेल्या ओसाका येथे आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. या भूकंपात तीन जण मृत्युमुखी पडले असून, त्यात 9 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चाळीसहून अधिक जखमी झाले असून, आपत्कालीन स्थितीमुळे शहरातील रेल्वेसेवा आणि मेट्रोसेवा...
जून 18, 2018
टोकिओ : जपानच्या पश्‍चिम भागात असलेल्या ओसाका येथे आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. या भूकंपात तीन जण मृत्युमुखी पडले असून, त्यात 9 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चाळीसहून अधिक जखमी झाले असून, आपत्कालीन स्थितीमुळे शहरातील रेल्वेसेवा आणि मेट्रोसेवा...
मे 06, 2018
सॅन फ्रान्सिस्को: किलाऊ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हवाई प्रांतातील बेटांना आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाच्या धक्‍क्‍यांनतर किलाऊ ज्वालामुखीमध्ये आणखी स्फोट झाले असल्याचे सांगण्यात आले. आज बसलेल्या एका भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 6.9 रिश्‍टर स्केल होती. किलाऊ...
फेब्रुवारी 28, 2018
पोर्ट मोरेस्बी - पापूआ न्यू गिनी येथे सोमवारी आलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍याने किमान 20 जण मृत्युमुखी पडले. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 7.5 इतकी होती. या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे येथील रस्त्यांचा संपर्क तुटला असून, अनेक इमारतींना तडे गेले आहेत. पोलिस उपायुक्त यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे...