एकूण 33 परिणाम
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
एप्रिल 08, 2019
नेमकी तीथ सांगावयाची तर विकारीनाम संवत्सरे श्रीशके 1941 चैत्र शुद्ध प्रतिपदा. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीखंडाचे यथेच्छ जेऊन तेथल्या तेथे आडवारलेल्या इतिहास पुरुषाला अंमळ डोळा लागत असतानाच अचानक भूकंप जाहल्याप्रमाणे सकल प्रिथिमी आंदोळिली. उत्तर ध्रुवापासोन दक्षिण ध्रुवापरेंत कडाकडा...
एप्रिल 03, 2019
(आम्ही न घेतलेली...) देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी, जागतिक पातळीवर एक प्रकारचा भूकंप घडवून आणणारी जगातली सर्वांत स्फोटक, धगधगती मुलाखत घेण्याचा मान आम्हाला मिळाला, हा आमचा गौरवच म्हणावा लागेल. आमच्या परंप्रिय साहेबांची ही मुलाखत घेण्यासाठी आम्ही (अर्थातच) प्रचंड...
मार्च 29, 2019
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन नाराज आमदारांना जाळ्यात ओढत सत्ताधारी भाजपने सत्तेवरील मांड पक्की केली; पण प्रश्‍न आहे तो अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा. गो मंतकाच्या समृद्ध, सांस्कृतिक भूमीत ‘खेळ तियात्र’ हा पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...
फेब्रुवारी 26, 2019
सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे करार बाजूला...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
जुलै 31, 2018
आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पृथ्वीच्या जन्मापासून...
मे 24, 2018
अमेरिकेने पाठविलेले ‘इनसाइट’ हे यान पहिल्यांदाच मंगळाच्या अंतरंगाविषयी माहिती मिळविणार आहे. ही मोहीम अनेक दृष्टीने महत्त्वाची असून, अंतरंगाच्या अभ्यासामुळे मंगळासारख्या ग्रहगोलांच्या निर्मितीवर नवा प्रकाश पडणार आहे. मं गळ हा सूर्यमालेतील सर्वांत चर्चेत असणारा ग्रह. अवकाशयानांचे युग सुरू झाल्यापासून...
एप्रिल 23, 2018
दादू : (मखलाशीने फोन फिरवत) म्यांव म्यांव!  सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया? शोभतं का तुला?  दादू : (खजील होत) तू दरवेळी माझा आवाज ओळखतोस कसा?  सदू : (शांतपणे) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही मांजराचे आवाज काढत नाही म्हणून!  दादू : (चिडून) उभ्या...
डिसेंबर 15, 2017
आपल्या भाषेतले कित्येक शब्द खूप अर्थसमृद्ध असतात, म्हणजे एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात आणि त्यांचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. हे शब्द कुठल्या वाक्‍यात, कुठल्या प्रसंगी वापरले गेले आहेत, याच्या संदर्भात त्यांचा त्या-त्या वेळचा अर्थ काय हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ "अर्थ'हाच शब्द बघा. वरील वाक्‍...
डिसेंबर 11, 2017
कोयना भूकंपामुळे पाटण तालुक्‍यातील नजीकच्या परिसराचे फार नुकसान झाले. मनुष्यहानीही झाली. नंतरच्या काळात बाधित गावांचे आणि प्रकल्पातील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले. पण त्याची फलश्रुती काय? वास्तविक पुनर्वसनात तीन विषय येतात. त्यांची गल्लत होऊ नये. एक म्हणजे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन....
ऑक्टोबर 02, 2017
विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे सातत्याने होणाऱ्या दोन राजकीय मेळाव्यांकडे केवळ मराठी माणसाचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असते. एक मेळावा महाराष्ट्राच्या राजधानीत होतो, तर दुसरा उपराजधानीत. शिवसेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या या दोन मेळाव्यांबरोबरच यंदा हाच...
सप्टेंबर 29, 2017
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबरोबरच इराणवरही ताशेरे ओढले आणि त्या देशाला 'दहशतवादी समर्थक' म्हणून घोषित केले. इराणच्या अणू कार्यक्रमासंदर्भातील आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी आणि इतिहासातील सर्वांत वाईट असल्याची संभावना ट्रम्प यांनी...
सप्टेंबर 23, 2017
महाराष्ट्राच्या राजकीय नेपथ्याला आपल्या बिनधास्त वर्तणुकीमुळे गेली दोन दशके आगळावेगळा साज चढवणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वत:ला 'ना घर का, ना घाट का!' अशा अवस्थेप्रत नेऊन ठेवले आहे. गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसारमाध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू...
ऑगस्ट 23, 2017
नेपाळचा राजकीय संक्रमण काळ संपण्याची चिन्हे नाहीत. पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांचा आज (ता.23) पासून सुरू होणारा भारतदौरा वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर होत आहे. वीस सप्टेंबर 2015 रोजी लागू झालेल्या राज्यघटनेवरून उभय देशांदरम्यान मतभेद आहेत. ही घटना नेपाळमधील संख्येने जास्त मधेशी, जनजाती व दलितांवर अन्याय...
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 10, 2017
यंदाचा एव्हरेस्ट मोसम नुकताच संपला. सतत बदलणारे खराब हवामान, चढाईसाठी आलेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीचा उच्चांक, अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामानाची अनिश्‍चितता, एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेले गिर्यारोहक, शेरपांच्या नव्या पिढीत कष्ट उपसण्याचे अन्‌ गिर्यारोहकासाठी जिवाची बाजी...
जून 06, 2017
सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले लाखो शिक्षक हे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या निवड चाचणीच्या ताज्या घोषणेमुळे "भूकंपग्रस्त' झाले आहेत. वरवर पाहता ही नवी चाचणी हा सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये नोकरी मिळण्याचा सरळ रस्ता वाटत असला, तरी तो खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावरून चालणारे हजारो...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...