एकूण 18 परिणाम
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि....
जुलै 11, 2018
अकोला : तीन दिवसांपासून वऱ्हाडात पावसाने ठाण मांडलेले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाचा जोर कायम आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलीमीटर तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलीमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी.पावसाची...
जुलै 09, 2018
अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे.  दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात...
जून 05, 2018
खामगाव : भरु दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या येळकोट करीन,  धन धान्याची भरू दे रास, अंगावर चढू  दे मूठभर मास, नावाचा तूझ्या येळकोट करीन...या ओळीतील भावना व्यक्त करत शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास...
मे 22, 2018
कऱ्हाड - वाढत्या नागरीकरणाबरोबरच जिल्ह्यातील पालिकांपुढे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. प्रक्रियेविना नद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आठपैकी केवळ तीन पालिका व एकमेव मलकापूर नगरपंचायतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प...
मे 17, 2018
सोलापूर - सध्या सुरू असलेल्या बाजार समित्यांसाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारापोटी तीनशे ते चारशे रुपये खर्च होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर प्रतिमतदार 25 रुपये खर्च प्रस्तावित करावा, असा प्रस्ताव सहकार प्राधिकरणातर्फे...
मे 13, 2018
आजचा ग्रामीण युवक हा काळानुरूप बदल स्वीकारत आहे. अनेक जण विविध परीक्षांमध्ये चमकताना दिसतात. तरीही ग्रामीण भागात मार्गदर्शन, पायाभूत सुविधांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीच दरी शेतकरी कुटुंबातील युवकांना सतावत होती. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचाराने अवघ्या २० ते २५ वर्षे...
मार्च 27, 2018
मलकापूर - योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात प्रथमच कऱ्हाड येथे ता. १४ ते १६ एप्रिल या कालावधीत येथील शिवाजी स्डेडियमवर तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुमारे २०० देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी...
नोव्हेंबर 29, 2017
कऱ्हाड - कृषी प्रदर्शनातुन प्रेरणा घेवुन ज्या शेतकऱ्यांनी शेती केली त्यांना याच प्रदर्शनात पुरस्कार देवुन गौरवण्यात येते, ही प्रदर्शनाची यशस्वीता आहे असे गौरवोदगार शेतीतज्ञ डाॅ. बुधाजीराव मुळीक यांनी आज (बुधवार) येथे काढले. शेतीत यापुढे रोबोटचे तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात कृषी...
ऑक्टोबर 29, 2017
बुलडाणा - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवण्यात यश अाले अाहे. यामुळे शिवारे पाणीदार झाली अाहेत.   जलयुक्त शिवार अभियानाने बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने चांगले बाळसे धरले आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३० गावे पहिल्या...
ऑगस्ट 05, 2017
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चुलत बंधू भाई पंजाबराव चव्हाण (वय ९३) यांचे पुणे येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती....
जुलै 09, 2017
महिलांनी ठरविले तर त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे अनेक जणींनी दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलेने मोताळा (जि. बुलडाणा) येथे टायपिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले अाणि गेली २६ वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. शोभाताई आणि अरविंद इंगळे हे दाम्पत्य बुलडाणा...
जून 30, 2017
तीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले...
जून 22, 2017
मोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेलगाव बाजार येथील अरुण भगवान तांदूळकर (४५) हे...
मे 30, 2017
मलकापूर - नरेंद्र मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये राज्याला दिले. त्यातून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी आगामी काळात शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 26, 2017
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाचे पाऊल; तरुणांनाही मिळणार रोजगार कऱ्हाड - माती परीक्षणासाठी सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी एकच शासकीय प्रयोगशाळा होती. तेथे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतून मातीचे नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळी परीक्षण करून मिळत नव्हते. हीच स्थिती...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे,...
जानेवारी 15, 2017
भाजपने कऱ्हाड दक्षिणमध्ये पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ नेते युतीबाबतचा निर्णय घेतील. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील सर्वच गट व गणात पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडे सत्ता असतानाही...