एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली. तर, २५८...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 21, 2018
चंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
सप्टेंबर 01, 2017
पुणे - सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानचा दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागांत...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांसह उत्तराखंड, पश्‍चिम मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगालमध्ये मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर...
ऑगस्ट 12, 2017
पुणे - दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे मध्य...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 5) आणि रविवारी (ता.6) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि परिसरातही हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या चोवीस तासांत...
ऑगस्ट 02, 2017
पुणे - कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी मंगळवारी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मात्र, पावसाची नोंद झाली नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. 5) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य...
जुलै 14, 2017
पुणे - राज्यात विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) पुण्यात गुरुवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावली. शहरातील पेठांसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर दुपारनंतर वाढत गेला. पुण्यात पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली, तर शुक्रवारी (ता. 14) कोकणात...
जून 28, 2017
पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सोमवारी (ता. २६) सायंकाळी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे, नदी, नाले वाहू लागले असून धरणक्षेत्रातही जोर कायम होता. कोकणातील पेण, हर्णे, खेड, दापोली, चिपळून, रोहा, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, महाबळेश्वर...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे...
जून 13, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान...
मे 14, 2017
मुंबई - मुंबई परिसरात शुक्रवारपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणखी दोन दिवस या सरी कोसळतील. सकाळी तसेच सायंकाळी हा पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली...
मे 09, 2017
पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष,...