एकूण 53 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
पुणे -  मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत...
एप्रिल 05, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या  पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान अजूनही कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. किमान तापमानाचा पारा...
जानेवारी 22, 2019
पुणे - राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पश्चिम आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या परस्पर विरोधीक्रियेमुळे गुरुवारपासून (ता.२४) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावर येणारे उष्ण व बाष्पयुक्त वारे यामुळे...
डिसेंबर 16, 2018
पुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमान सरासरीच्या वर गेल्याने राज्याच्या बहुतांशी भागात थंडी कमी झाली आहे. शुक्रवारी (ता. १४) दुपारनंतर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग...
डिसेंबर 10, 2018
पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी विजेच्या कडाकडाटासह अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून द्राक्षे, कांदे, डाळिंब आदी पिकांचे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सातारा, बीड,...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली. तर, २५८...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता...
ऑगस्ट 22, 2018
पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे.  दुष्काळी भाग...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
मे 29, 2018
पुणे - अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. ३०) या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्या, बुधवारपासून (ता. ३०) राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  अरबी...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...