एकूण 46 परिणाम
जून 10, 2019
पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे.  भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 20, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती...
एप्रिल 13, 2019
सातारा - वाढत्या तापमानामुळे अंगाची काहिली होत असतानाच जिल्ह्यात आता पाणीटंचाईचे संकटही घोंगावत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील भूजल पातळीत पाच तालुक्‍यांत घट झाली आहे. भूजल पातळीत झालेली घट अडीच मीटरपर्यंत आहे. तळपत्या सूर्यामुळे तापमान वाढून भूजल पातळी खालावली...
मार्च 16, 2019
वाई - वाई-खंडाळा-म’श्‍वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याचीच चर्चा गावागावांतील पारांवर रंगत आहे. या ठिकाणी शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाने आपला हक्क सांगितला असला तरी,...
फेब्रुवारी 25, 2019
वाई/ सातारा - आपल्या भवितव्यासाठी आणि कारखान्यांच्या सभासद हितासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची अपेक्षा व्यक्‍त करत वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील कार्यकर्ते, कारखान्यांचे सभासद यांनी आज माजी आमदार मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.  दरम्यान,...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेशिस्तीचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शिक्षकांच्या अधिवेशनामुळे तर त्याचा कहर झाला आहे. तब्बल पाच हजार ६४३ शिक्षक, ३९ केंद्रप्रमुख रजा मंजूर नसतानाही गोव्यातील अधिवेशनाला गेले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांची व्यवस्था...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
डिसेंबर 29, 2018
सातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक गती मिळत आहे. या जीवनवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी ‘त्रिसूत्री’ निश्‍चित केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०७ गावांकडून जिल्हा परिषदेने...
डिसेंबर 12, 2018
वाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने येथील बाजार समितीत झालेल्या मोफत कृत्रिम पाय (जयपूर फूट) व पोलिओ कॅलिपर्स शिबिरात ७५ अपंगांच्या पायाची मापे घेण्यात आली. आता त्यांना जानेवारीच्या...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी...
ऑक्टोबर 18, 2018
सातारा -  जिल्ह्यात महाबळेश्‍वर, सातारा तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, भूजल पातळी खालावल्यामुळे यंदा 110 गावांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. पूर्व भागात पावसाळ्यापासूनच काही गावांना...
सप्टेंबर 17, 2018
सातारा - तंटामुक्त गाव अभियानाप्रमाणे पोलिस विभागाचा "एक गाव- एक गणपती' उपक्रमही राज्यबर गाजला. संपूर्ण गाव एकत्रित येऊन एकच सार्वजनिक गणपती बसवत असल्याने गावात एकोपा वाढण्यास मदत होत असते. यावर्षीही जिल्ह्यातील 522 गावांत "एक गाव- एक गणपती' उपक्रम यशस्वीपणे सुरू राहिला आहे. शिवाय, या गावांमध्ये...
ऑगस्ट 31, 2018
सातारा - मेघालयातील चेरापुंजी म्हणजे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहे. यावर्षी मात्र गिरिस्थान महाबळेश्‍वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. चेरापुंजीला यावर्षी आजवर चार हजार ७३५ मिलिमीटर, तर महाबळेश्‍वरला तब्बल पाच हजार ५७२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍...
जुलै 10, 2018
सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, कोरेगाव या तालुक्‍यांत उगवण झालेली पिके पूरेशा पावसाअभावी धोक्‍यात लागली आहेत. दरम्यान जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. इतर सर्व तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस...
जून 28, 2018
सातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी...
जून 15, 2018
सातारा - राज्यातील सर्व शाळांबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतररराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, योग दिन हा केवळ एक दिवसापुरता न होता तो योग महोत्सव ठरावा यासाठी प्रयत्न...
जून 09, 2018
काशीळ - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये सातारा जिल्ह्यासाठी दोन हजार ८२५ हेक्‍टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उद्दिष्टात एक हजार ७१४ हेक्‍टरने घट करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यासाठी चार हजार ५३९ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक...
जून 06, 2018
कऱ्हाड - श्‍वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे श्‍वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात वर्षात तब्बल आठ हजार 962 जणांना श्‍वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतही अनेक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली...