एकूण 130 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक : शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस डॉक्‍टरांकडून घेतला जातो आहे. गेल्या काहीवर्षांमध्ये बोगस बंगाली डॉक्‍टरांनीही आदिवासी भागात शिरकाव केला असून, गरीब-अशिक्षित आदिवासीच्या जीवावरच बेतते आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही ढिम्म...
जुलै 24, 2019
मुंबई - राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी घेतला आहे. ही वाढ सुमारे दुप्पट असणार आहे. गेल्या नऊ वर्षापासून ही वाढ प्रलंबित होती. राज्यातील 10 लाख दुकाने आणि आस्थापना यांच्यावरील...
जून 24, 2019
पंचवीस हजारांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी असणार एक काझी सोलापूर - काझी अधिनियम १९८०च्या कलम दोनमधील तरतुदीनुसार राज्यातील मुस्लिम लोकसमूहाची लक्षणीय वस्ती असलेल्या भागातील पात्र व्यक्तीमधून एक किंवा अधिक काझींची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकाराचा वापर करत काझींच्या पात्रतेचे निकष...
जून 12, 2019
मुंबई - महापालिका क्षेत्रात वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांवर महापालिकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. मात्र खासगी कंपन्या हाच कर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडून वसूल करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यामुळे ग्राहकांची...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
फेब्रुवारी 11, 2019
काँग्रेसकडून नागपूर हिसकावून घेतल्यानंतर तो भाजपचा बालेकिल्ला झाला. नितीन गडकरींसह मुख्यमंत्र्यांनी मोठे कार्य उभे केले हीच जमेची बाजू आहे. मात्र, सामाजिक नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. भाजपचे ‘हेवी वेट’ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 03, 2018
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाज मारल्याचे दिसून येते. स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे उडणारे खटके यामुळे त्यांना...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : निवडणूक लढवणारा उमेदवार मान्य नसल्यास स्थानिक निवडणुकीत मतदारांनी "नोटा'चा सर्वाधिक पर्याय निवडल्यास त्या मतदारसंघात फेरनिवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याने देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हा निर्णय...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - " साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा...! सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...
सप्टेंबर 29, 2018
धुळे - राफेल विमान खरेदीत दोन ते तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून त्यातील पैसा ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून होत असेल तर तो देशद्रोहच आहे, असा जहाल आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे इव्हीएम मशिन हॅकर,...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाच्या "...
सप्टेंबर 09, 2018
नाशिक : युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यपाच्या निवडणुकीत देशभरात सर्वाधीक संघर्ष आणि गटबाजीचे प्रदर्शन होते. त्यावर महाराष्ट्रातील वरीष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत नवा पायंडा पाडला आहे. यातुन पुढे आलेल्या फॉर्मुल्यानुसार युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे....
ऑगस्ट 16, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे माध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे. ...