एकूण 2602 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप...
जुलै 19, 2019
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खास तयारी केली जात आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीकडून तब्बल 2200 ज्यादा बसेसची सोय केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले....
जुलै 19, 2019
पुणे : तुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत. कारण, येत्या काळात मत्स्यप्रेमींचे हे लाडके मासेच समुद्रातून कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हे मासे समुद्रातून...
जुलै 19, 2019
मुंबई : ईव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक घेण्यावर काही दिवसांपूर्वी विश्वास दाखवणाऱ्या अजित पवारांनीही आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, असे नागरिकांशी बोलताना समजले. लोकशाही...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याची माहिती...
जुलै 18, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरु असताना आता नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नाही, असे विधान त्यांनी केले. तसेच ...
जुलै 18, 2019
कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान... राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?... पुण्यात बनवली बॅटमॅनची टम्बलर कार... धावपटू हिमा दासचा सुवर्ण चौकार... खरा सुपरस्टार राजेश खन्नाच!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 18, 2019
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठीच्या 865 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव आणि तपशील : पदाचे नाव आणि संख्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 35 पदे...
जुलै 18, 2019
पाचोरा (जि.जळगाव) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नवीन महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यांचा आशीर्वाद घेवूनच मी मातोश्रीतून बाहेर पडलो आहे. ही माझी तीर्थयात्रा आहे, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने पाचोरा येथे आयोजित...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य...
जुलै 17, 2019
मुंबई - पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेनेची भूमिका ही दुतोंडी असून, शिवसेना ज्या युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने आधार कार्ड नंबरसारख्या थातुरमातूर कारणावरुन शेतकऱ्यांना विमा नाकारला किंवा प्रलंबित ठेवला त्याच युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून शिवसेना मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा विमा उतरवते. शिवसेनेने यांच्याविरोधात आज...
जुलै 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य नाही, अशी...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केलेल्या आयुर्वेदिक कोंबडीचा शोध साम वाहिनीने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात जाऊन घेतला आणि तेथे आढळून आली ही आयुर्वेदिक कोंबडी.   राज्यसभेत सोमवारी आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना राऊत यांनी अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा देऊन टाका, ही...
जुलै 16, 2019
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली बांधिलकी आणि...
जुलै 16, 2019
मुंबई:  दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने  आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री ढाले हे  समतेसाठीच्या चळवळीतील एक...