एकूण 979 परिणाम
जून 25, 2019
पुणे - राज्यातील सुमारे २० हजारांहून अधिक अनुदानित शाळांमधील जवळपास ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर तत्काळ भरती करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे सोमवारी शिक्षण आयुक्त...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था एकत्रित...
जून 24, 2019
नाशिक - केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने पीएच. डी.धारकांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ लागू करूनही राज्य सरकारच्या निर्णयात १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढ अमान्य करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्‍टो) आंदोलन सुरू केले आहे. महासंघातर्फे उद्या (ता. २४) दुपारी बारा वाजता...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 20, 2019
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता....
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी रुग्णालयातील...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 13, 2019
सावंतवाडी - शहरात वीज वितरणच्या समस्यांबाबत येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांना घेराओ घातला. कार्यालयाकडून ट्री कटिंगची अपेक्षित कामे झाले नाहीत. वीज बत्ती गुल होण्याचे प्रकार पहिल्या पावसातच सुरू झाले आहेत. मोठा पाऊस सुरू झाला तर आणखी समस्या निर्माण...
जून 08, 2019
उल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने...
जून 06, 2019
पुणे - राज्यातील अडचणीतील सहकारी पतसंस्थांमध्ये सात लाखांहून अधिक ठेवीदारांच्या तब्बल सातशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. आंदोलने, उपोषण करूनही या ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील भुदरगड, चंद्रकांत बढे यांसह काही...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 21, 2019
मुंबई - दुष्काळाबाबत माहिती अधिकारात विचारलेली कोणतीही माहिती राज्य सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. महाराष्ट्र...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 17, 2019
मुंबई - खळखट्ट्याक करणारा पक्ष म्हणून ओळख असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून, ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. 17) पहिले आंदोलन केले जाणार...