एकूण 425 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी...
ऑक्टोबर 16, 2019
अभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलवडी (जि. सातारा) येथील युवा शेतकरी आबासाहेब हणमंतराव भोसले. ‘एमएस्सी’ कृषीचे शिक्षण घेतलेल्या भोसले यांनी दुष्काळी भागात ग्लॅडिओलस फूलपीक यशस्वी करून त्यात मास्टरी संपादन केली आहे. बाजारपेठेतील मागणी ओळखून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड व...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य शासनाने अचानक नकार दिल्याने डेअरी उद्योग संतप्त झाला आहे. दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, “सरकारच्या पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. त्यामुळे निर्यात...
ऑक्टोबर 14, 2019
यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता भासणार असल्याने यंदा हंगाम कमी काळ चालेल. तसेच बरेच कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करू शकणार नाहीत, असे चित्र आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक अडचणीची स्थिती आहे. तेथील मोजकेच कारखाने यंदा उसाचे...
ऑक्टोबर 14, 2019
वेलतूर, नागपूर  - गरिबांच्या झोपडीचा आधार असलेला बांबू मीनाक्षीने कल्पकतेचा नवाधार देत सातासमुद्रापार धनिकांच्या दिवाणखान्यात पोचविला आहे. सध्या तिच्या बांबूकलेने कलाप्रेमींना मोठे वेड लावले आहे. मीनाक्षी साकारत असलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आजघडीला साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध...
सप्टेंबर 23, 2019
कांद्याच्या वाढत्या किमतीने हवालदिल झालेल्या केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध (स्टॉक लिमिट) लागू करण्याचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत आणि देशातील अनेक ठिकाणी कांद्याचे दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर पोचले आहेत.  कांदा पुरवठ्याची स्थिती सुधारून येत्या दोन-तीन दिवसांत...
सप्टेंबर 17, 2019
गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक आणि मागणी यांच्यातील तफावत वाढल्याने हिरव्या मिरचीचा बाजार चांगलाच कडक राहिला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून मिरचीचा सर्वाधिक दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत...
सप्टेंबर 08, 2019
छोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते, याचे उदाहरण म्हणजे दाभा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील मनीषा सचिन टवलारे. कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध चवींच्या शेवया तसेच कढीपत्ता, मेथी आणि पुदिना पावडर निर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई - महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरू करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाइन पद्धतीने थेट खरेदी करू शकतात. मागील काही वर्षांत बचतगटांच्या...
ऑगस्ट 21, 2019
सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीट कॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून, ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात, हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिद्ध केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली.  श्री शिवसाई एक्‍स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - राज्याला हादरून सोडणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. मात्र, तांत्रिक अभ्यासात ‘अलमट्टी’चा दोष अद्यापही सिद्ध झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवते, याचे गूढ आणखी वाढले आहे. महापुराचा रहस्यभेद...
ऑगस्ट 12, 2019
सलग सहा महिन्यांनंतरही तोटा थांबत नसल्याने; खाद्यापुरतेही पैसै मिळत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून पक्षी विक्रीचे सत्र सुरू केले आहे. पॅनिक सेलिंगमुळे अंड्याचे बाजारभाव दररोज तळाला जात आहेत. पुणे विभागात रविवारी (ता.११) पोल्ट्री फार्मवरील प्रतिनग अंडी लिफ्टिंग रेट ३ रुपये...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात...
जुलै 28, 2019
मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत बँकेकडून अर्थसाह्य न घेता, स्वतः आर्थिक गुंतवणूक करून काळे तिखट, लाल तिखट, शेंगा चटणी निर्मिती उद्योगाला सुरवात केली. बाजारपेठेत ओळख तयार करण्यासाठी ज्ञानेश्वरी ब्रॅंड तयार केला. अल्पावधीतच त्यांनी स्थानिक मार्केट मिळवले....
जुलै 25, 2019
पुणे  : उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. अरबी समुद्र, उत्तर कोकण व दक्षिण गुजरात या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २४) कोकणात धारावी, कोयना,...
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
जुलै 21, 2019
जालना-  ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा आलेख चढता ठेवला आहे. पारंपरिक पीकपद्धती बदलून द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू लागवडीला चालना दिली. दुष्काळी परिस्थितीला टक्कर देत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करीत कडवंचीतील...