एकूण 24 परिणाम
जून 07, 2019
हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला...
मे 18, 2019
‘कुटुंब’ ही संकल्पना जगात सर्वत्र दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणे आवश्‍यक असते. दर वर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो, किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यापरीने त्या विषयात काय योगदान...
मे 03, 2019
प्रत्येकाला जीवनात करमणूक हवी असते. हसण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सर्व प्रकारेच मानसिक ताण, दुःख हसण्याने कमी होतातच, तसेच हसण्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची तयारी होते. त्यामुळे लोकांची करमणूक करणाऱ्यांना जनमानसात सर्वाधिक लोकमान्यता मिळते, त्यांना भरपूर पैसेही मिळतात. सध्या ‘स्टॅंड अप कॉमेडी’...
मे 03, 2019
शरीराच्या आरोग्याचे अनेक मापदंड असतात. शरीरबांधा, भूक, तहान, चांगली पचनशक्‍ती, शांत झोप वगैरे अनेक मुद्द्यांच्या मदतीने शरीराचे आरोग्य समजून घेता येते. नाना तऱ्हेच्या तपासण्यासुद्धा शरीरातील बिघाड किंवा शरीराची समस्थिती सांगण्यास सक्षम असतात. मन मात्र शरीरापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते. मनाचे...
मार्च 22, 2019
टी.बी. किंवा क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत, परंतु अजून तरी याला म्हणावे तसे यश मिळालेले दिसत नाही. १८८२ मध्ये सर्वप्रथम क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लागला तो डॉ. रॉबर्ट कॉक यांनी. हा दिवस होता २४ मार्च. म्हणून २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून...
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी...
फेब्रुवारी 08, 2019
जरासे कमी झालेले स्वाइन फ्लू , डेंग्यू वगैरे विकार सध्या पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. जेव्हा वातावरण सर्वच अंगांनी दूषित होते तेव्हा असे रोग वाढतात असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहे.  साथीचे विकार किंवा वातावरण, अन्न वगैरे दूषित झाल्यामुळे होणारे विकार अत्यंत अवघड असतात, हे आपल्याला समजून घ्यायला...
फेब्रुवारी 03, 2019
समाजातील सर्व थरांत माहिती असणारा आधुनिक रोग म्हणजे कर्करोग असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना लागण होणारा, खूप संशोधन करूनही नेमके कारण, नेमके उपचार न समजणारा हा रोग! चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने आपण आज...
जानेवारी 27, 2019
इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू...
जून 15, 2018
आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...
मार्च 09, 2018
आपल्या शरीरात पाच प्रमुख संस्था कार्यरत असतात ः मज्जासंस्था, रक्ताभिसरणसंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि मूत्रविसर्जन व प्रजननसंस्था. या महत्त्वाच्या संस्था व त्यांच्या अंतर्गत अवयवांना निसर्गाने त्यांची कामे ठरवून दिलेली आहेत. आपणास कोणत्याही प्रकारची विशेष जाणीव न होता, ते ते अवयव त्यांची कामे...
जानेवारी 26, 2018
पंधरा ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान कार्यरत झाले, जी स्वातंत्र्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्कामोर्तब करणारी घटना होती. म्हणून दर वर्षी आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधान हे भारताच्या...
जानेवारी 05, 2018
योग्य प्रमाणात खाल्ला तर मधुर रस पचनाला मदत करतो व शरीरपुष्टी करतो. पण याचे अतिप्रमाणात सेवन केले गेले तर तो पचायला जड पडतो व ही न पचलेली साखर रक्‍तात राहून  मधुमेहाकडे वाटचाल सुरू होते. ‘‘आहेत का गुळगुळेसाहेब?’’ असा बाहेरून प्रश्न विचारला गेला. दार तर उघडेच होते. पत्नीने आतून सांगितले, ‘‘या आत,...
ऑक्टोबर 13, 2017
‘ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस...’ विंदा करंदीकरांचे शब्द ओठावर आहेत, पण सकाळपासून एकूणच ‘झपताल’ मंद झाला आहे असे वाटते आहे. एरव्हीची पायात लुडबुडणाऱ्या मांजरासारखी स्वप्ने आज तिच्या आसपासही नाहीत. तिचे चित्तच मुळी आज थाऱ्यावर नाही. सकाळपासून प्रत्येक बाबतीत केवळ चिडचिड होतेय...
सप्टेंबर 08, 2017
आदर्श शिक्षक आणि शिकण्यासाठी तत्पर असणारा शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति’ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे.   शिक्षक दिन...
सप्टेंबर 08, 2017
समाजात सुख, शांती, समृद्धी मिळावी अशी इच्छा असेल तर ज्ञानसंवर्धन होणे, ज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त होणे आवश्‍यक आहे. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रतिष्ठा, मान व मोबदला मिळायला हवा. सतत शिकत राहणे ही आयुष्याची गरज असायला पाहिजे. शिकायचे म्हटले तर शिक्षकाची, गुरूची आवश्‍यकता असते. ज्ञानशक्‍ती असो...
ऑगस्ट 11, 2017
यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात. कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते....
ऑगस्ट 11, 2017
पित्ताशयाकडून अन्नमार्गात येणारे स्राव म्हणजेच पाचक पित्त काही कारणास्तव जेव्हा अडते तेव्हा ते अडलेले पित्त नेहमीप्रमाणे अन्नमार्गातून अधोगामी न होता उलट रस-रक्‍तधातूंपर्यंत पोचते व काविळीची लक्षणे दिसू लागतात. पित्ताशयात पित्ताचा खडा होण्याने, पित्ताच्या मार्गात कफदोष वाढल्याने, पित्तमार्गावर गाठ...
जून 02, 2017
आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी...
एप्रिल 20, 2017
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. गरीब, गरजूंच्या आरोग्याच्या तपासणीची मोहीम पहिल्या टप्प्यात नाशिकसह पालघर, अकोला, बीड,...